Ahmedabad Plane Crash Reason : 825 फूट उंचीवरून कोसळले विमान, कुठ चूक झाली, नेमकं कारण काय?
Ahmedabad Plane Crash Reason : गुजरातमधील अहमदाबाद येथे 12 जून 2025 (गुरुवार) रोजी एक मोठा विमान अपघात झाला. सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडन (गॅटविक) ला जाणारे एअर इंडियाचे विमान AI171, उड्डाणानंतर अवघ्या दोन मिनिटांत मेघानी नगर परिसरात कोसळले.
बोईंग 787-8 ड्रीमलाइनरमध्ये 242 लोक होते, ज्यात 169 भारतीय, 53 ब्रिटिश, 7 पोर्तुगीज आणि 1 कॅनेडियन नागरिक होते.
अपघातात विमान एका निवासी इमारतीला धडकले. जिथे सिव्हिल हॉस्पिटलचे पंधराहून अधिक डॉक्टर जखमी झाले आहेत.
आता प्रश्न असा निर्माण होतो की, अपघाताचे खरे कारण काय आहे? अपघात कसा झाला?, नेमकं असं काय घडलं की, 15 मिनिटांमध्ये होत्याचं नव्हतं झालं..!

How Air India Flight Crash Happened : अपघात कसा झाला? चूक कशी झाली?
दुपारी १:३८ वाजता विमानाने उड्डाण केले आणि दुपारी १:४० वाजता अपघात झाला. विमान विमानतळाच्या भिंतीजवळ आणि कस्टम कार्गो ऑफिसजवळ मेघनी नगरमध्ये कोसळले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे की विमान ८२५ फूट उंचीवर पोहोचले होते, तेव्हा अचानक ते खाली पडले, ज्यामुळे मोठा स्फोट झाला आणि परिसरात काळा धूर पसरला. विमानात लांब पल्ल्याच्या उड्डाणासाठी जड इंधन भरले होते, ज्यामुळे आग अधिक भयानक बनली. कॅप्टन सुमित सभरवाल आणि फर्स्ट ऑफिसर क्लाईव्ह कुंदर विमान उडवत होते. टेकऑफनंतर लगेचच वैमानिकाने मेडे कॉल जारी केला होता, परंतु त्यानंतर हवाई वाहतूक नियंत्रणाशी संपर्क तुटला.
#WATCH Rescue and relief operations are underway at the site of the Air India plane crash in Ahmedabad
— ANI (@ANI) June 12, 2025
A green corridor to transport injured passengers for treatment and to hospitals is being established. pic.twitter.com/oUfpTc7VTB
Air India Flight Crash Reason : कारण काय होते?
अपघाताचे नेमके कारण अद्याप तपासाधीन आहे. नागरी उड्डयन महासंचालनालय (डीजीसीए) आणि बोईंगचे पथक ब्लॅक बॉक्स, फ्लाइट डेटा आणि क्रॅश साइटची तपासणी करत आहेत. तथापि, बोईंग ७८७-८ ड्रीमलाइनरच्या इतिहासात अनेक तांत्रिक त्रुटी समोर आल्या आहेत-
- २०१३ मध्ये बॅटरीला आग : दोन ड्रीमलाइनर विमानांमध्ये लिथियम-आयन बॅटरीला आग लागल्याच्या घटना घडल्या, त्यानंतर FAA ने तीन महिन्यांसाठी सर्व ड्रीमलाइनर उड्डाणे ग्राउंड केली.
- इंजिन आणि इलेक्ट्रिकल बिघाड: जनरल इलेक्ट्रिक GEnx आणि रोल्स-रॉइस ट्रेंट १००० इंजिनमध्ये बिघाड, इंधन गळती, विंडशील्डमध्ये क्रॅक आणि सॉफ्टवेअर ग्लिचची तक्रार नोंदवण्यात आली.
- २०२४ मध्ये जपान अपघात: हायड्रॉलिक ऑइल गळतीमुळे ANA च्या ७८७-८ ला विमान धावपट्टीवर थांबवावे लागले.
बचाव कार्य अति वेगात सुरूच
मेघानी नगरच्या निवासी भागात विमान कोसळले, ज्यामुळे जवळच्या इमारतींचे नुकसान झाले. सात अग्निशमन दल, सहा NDRF पथके, पोलिस आणि रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी पोहोचल्या. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयांच्या रुग्णवाहिकांमध्येही कमतरता असल्याचे सांगण्यात येत आहे.
एअर इंडियाने काय स्पष्टीकरण दिले?
एअर इंडियाने त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवर म्हटले आहे की, १२ जून २०२५ रोजी उड्डाणानंतर विमान AI171 क्रॅश झाले. आम्ही तपशील गोळा करत आहोत आणि लवकरच अपडेट्स शेअर करू. प्रवाशांच्या माहितीसाठी एअरलाइनने १८०० ५६९१ ४४४ हा हॉटलाइन क्रमांक जारी केला आहे.
पहिला प्राणघातक ड्रीमलाइनर अपघात
बोईंग ७८७ ड्रीमलाइनरचा हा पहिला प्राणघातक अपघात आहे. हे विमान त्याच्या इंधन कार्यक्षमतेसाठी आणि प्रगत तंत्रज्ञानासाठी ओळखले जाते, परंतु गेल्या काही वर्षांत त्याच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले आहे. २०१३ आणि २०२४ च्या घटनांमुळे त्याच्या विश्वासार्हतेबद्दल शंका निर्माण झाल्या होत्या.
विजय मल्ल्याने काय म्हटले?
विजय मल्ल्यानेही त्यांची प्रतिक्रिया दिली. एअर इंडियाच्या अपघाताची बातमी ऐकून खूप दुःख झाले असे म्हटले. शोकाकुल कुटुंबे आणि त्यांच्या प्रियजनांना माझ्या संवेदना आणि प्रार्थना.
पंतप्रधान मोदींनी अपघाताची घेतली माहिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांच्याशी बोलून अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताच्या घटनेची माहिती घेतली.
मंत्र्यांनी पंतप्रधानांना सांगितले की ते बचाव आणि मदत कार्याचे निरीक्षण करण्यासाठी अहमदाबादला जात आहेत. पंतप्रधानांनी मंत्र्यांना त्वरित सर्व आवश्यक मदत देण्याचे निर्देश दिले आहेत
परिस्थितीबद्दल नियमित अपडेट ठेवण्यास सांगितले आहे. सर्व संबंधित एजन्सी हाय अलर्टवर आहेत आणि समन्वित प्रयत्न सुरू आहेत.
विमानात कोण होते?
२१७ प्रौढ
११ मुले
२ अर्भकं
१६९ भारतीय
५३ ब्रिटिश
१ कॅनेडियन
७ पोर्तुगीज












Click it and Unblock the Notifications