Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

अहमदाबाद हादरले! 12 नामांकित शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; ईमेलमध्ये अमित शहा व बिश्नोईचा उल्लेख

Ahmedabad Bomb Threat : गुजरातची आर्थिक राजधानी असलेल्या अहमदाबादमध्ये आज (बुधवार, १७ डिसेंबर २०२५) खळबळजनक घटना घडली. शहरातील किमान १२ नामांकित शाळांना सकाळी बॉम्बने उडवून देण्याचे धमकीचे ईमेल प्राप्त झाले. विशेष म्हणजे, या ईमेलमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि खलिस्तानी जनमत चाचणीचा उल्लेख असल्याने सुरक्षा यंत्रणांची झोप उडाली आहे.

Ahmedabad Bomb Threat

दुपारी 1:11 वाजता स्फोटाची दिली होती वेळ

धमकीच्या ईमेलमध्ये अत्यंत चिंतेची बाब नमूद करण्यात आली होती. "अहमदाबाद शाळेपासून साबरमती तुरुंगापर्यंत स्फोट होतील," असा वाक्यांश वापरून दुपारी 1 वाजून 11 मिनिटांनी स्फोट करण्याची धमकी देण्यात आली होती. या घटनेची माहिती मिळताच संपूर्ण गुजरातमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला.

धोक्याच्या सावटाखालील प्रमुख शाळांची यादी

धमकी मिळालेल्या शाळांमध्ये अहमदाबादमधील अतिशय प्रतिष्ठित शाळांचा समावेश आहे:

झेबर स्कूल (थलतेज)

झायडस स्कूल (वेजलपूर)

महाराजा अग्रसेन विद्यालय (गुरुकुल रोड)

डीएव्ही इंटरनॅशनल स्कूल (मकरबा)

उदगम स्कूल (थलतेज)

अहमदाबाद इंटरनॅशनल स्कूल (वस्त्रपूर)

निर्माण स्कूल (वस्त्रपूर)

याशिवाय गांधीनगर, कलोल आणि डीपीएस भोपाळ, ट्यूलिप इंटरनॅशनल यांसारख्या शाळांनाही लक्ष्य केल्याचे वृत्त आहे.

शाळांमध्ये गोंधळ अन् पालकांची घबराट

धमकी मिळाल्यानंतर शाळा प्रशासनाने तातडीने पावले उचलली. पालकांना "तात्काळ शाळेत येऊन आपल्या पाल्याला घरी घेऊन जावे" असे संदेश धाडण्यात आले.

संदेश मिळताच पालकांनी शाळेच्या गेटवर मोठी गर्दी केली. वैशालीबेन रावल या पालकाने आपली भीती व्यक्त करताना सांगितले की, "शाळेचा मेसेज आल्यावर आम्ही घाबरलो होतो. शाळांना अशा प्रकारे लक्ष्य करणे अतिशय भयानक आहे."

पोलीस आणि यंत्रणांचा मोठा फौजफाटा तैनात

धमकीचा संदेश मिळताच खालील पथके शाळांमध्ये दाखल झाली:

  • बॉम्ब निकामी पथक (BDS)
  • श्वान पथक (Dog Squad)
  • अग्निशमन दल

गुन्हे शाखेचे पथक (Crime Branch)

शाळेचे वर्ग, मैदाने आणि संपूर्ण परिसराची कसून तपासणी करण्यात आली. आतापर्यंतच्या तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळलेली नाही.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+