Air India plane crash : काय असते Mayday Call?, जो विमान अपघातापूर्वी पायलटने ATCला केला होता!
Air India plane crash : अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान उड्डाणानंतर दोन मिनिटांनी क्रॅश झाले आहे. एअर इंडियाच्या विमानात (AI171) 242 प्रवासी होते. आता एअर इंडियाच्या विमान अपघाताबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. विमानाच्या पायलटने अपघातापूर्वी एटीसीलाम Mayday Call केला होता. काही क्षणांनंतरच विमान अपघातात कोसळले.
प्रवाशांना घेऊन जाणारे एअर इंडियाचे हे विमान गुरुवारी दुपारी 1:39 वाजता अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केले. विमान वाहतूक अधिकाऱ्यांनी उघड केले आहे की एअर इंडियाच्या विमानाने टेकऑफ केल्यानंतर काही मिनिटांनी एटीसीला मेडे कॉल केला, परंतु त्यानंतर एटीसीने केलेल्या कॉलला विमानाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

एटीसीने सांगितले की एअर इंडियाचे विमान दुपारी 1:39 वाजता धावपट्टी 23 वरून अहमदाबादहून उड्डाण केले. टेकऑफ झाल्यानंतर पाच मिनिटांनी विमान विमानतळाबाहेर कोसळले. या अपघाताच्या व्हिडिओमध्ये, विमान अचानक गर्दीच्या ठिकाणी खाली कोसळताना आणि अचानक आगीच्या गोळ्यात रूपांतरित होताना दिसत आहे.
Mayday Call म्हणजे काय?
'मेडे कॉल' म्हणजे विमानाच्या कॅप्टनने पाठवलेला आपत्कालीन संदेश. म्हणजेच 'मेडे कॉल' द्वारे, कोणताही पायलट एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) आणि जवळच्या विमानांना विमानाला तात्काळ मदतीची आवश्यकता असल्याचे सूचित करतो.
कोणत्या परिस्थितीत पायलट Mayday कॉल करतो?
जेव्हा विमान गंभीर संकटात असते किंवा विमानातील प्रवाशांचे किंवा क्रू मेंबर्सचे जीव धोक्यात असतात तेव्हा पायलट एअर ट्रॅफिक कंट्रोलर (एटीसी) ला हा सिग्नल पाठवतो. याशिवाय, विमानाचे इंजिन निकामी झाल्यावर किंवा उड्डाणानंतर अडथळ्यामुळे टक्कर होण्याचा धोका असतो, विमानात आग लागते किंवा अपहरण होते तेव्हा 'मेडे कॉल' केला जातो.
Mayday Mayday Mayday... हे तीन वेळा म्हणण्याचा अर्थ काय?
विमानाच्या रेडिओवर "मेडे, मेडे, मेडे" असे तीन वेळा म्हटले जाते जेणेकरून हे स्पष्ट होईल की हा विनोद नाही तर एक वास्तविक संकट आहे.
Mayday CALL नंतर ATC काय करते?
'मेडे' कॉल येताच, एटीसी कंट्रोल रूम अडचणीत असलेल्या विमानाला सुरक्षित करण्यासाठी सर्व उपलब्ध संसाधने तैनात करते. जसे की आपत्कालीन लँडिंगसाठी विमानाला परवानगी देणे, धावपट्टी मोकळी करणे, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दल तयार ठेवणे.












Click it and Unblock the Notifications