आसाममध्ये पुन्हा रेल्वे अपघात; आगरतळा-लोकमान्य टिळक एक्स्प्रेसचे 8 डबे रुळावरून घसरले
नवी दिल्ली : आसाममधून रेल्वे अपघातची बातमी समोर आली आहे. आसमच्या डिब्लॉन्ग स्टेशनवर आगरतळा-लोकमान्य टिळक एक्स्प्रेसचे आठ डबे रुळावरून घसरले आहेत. हा अपघात आज दुपारी 3.55 च्या सुमारास घडला आहे. लोकमान्य टिळक एक्स्प्रेस ही मुंबईकडे रवाना झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार या रेल्वे अपघातात अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
एएनआय या वृतसंस्थेने याबाबतचं वृत दिलं आहे. आगरतळा-लोकमान्य टिळक एक्सप्रेस आसाममधील डिब्लॉन्ग स्टेशनवर दुपारी 3:55 च्या सुमारास रुळावरून घसरली. आसाममधील दिमा हासाओ जिल्ह्यात ही घटना घडली. या घटनेवर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांची प्रतिक्रियाही समोर आली आहे.

मदत आणि बचाव कार्यासाठी पथके रवाना
आगरतळा-लोकमान्य टिळक एक्स्प्रेस गुरुवारी सकाळी निघाली होती. रेल्वे अधिकारी आणि पोलिसांचे पथकही घटनास्थळी रवाना झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी रवाना झाले. ते लुमडिंग येथून मदत आणि बचाव कार्यासाठी निघाले. लुमडिंग बदरपूर सिंगल लाईन सेक्शनवर झालेल्या रेल्वे अपघातानंतर गाड्यांची वाहतूक बंद करण्यात आली आहे.
8 coaches of Agartala-Lokmanya Tilak Express derails in Assam
— ANI Digital (@ani_digital) October 17, 2024
Read @ANI Story | https://t.co/kD72eltdz3#Derailment #Train #AgartalaLokmanyaTilak pic.twitter.com/eMFJ20CAlH
मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी दिली माहिती
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी आपल्या सोशल मिडिया या X वर लिहिले आहे की 12520 आगरतळा-एलटीटी एक्स्प्रेसचे 8 डबे गुरुवारी दुपारी 15:55 वाजता लुमडिंगजवळ डिब्लॉन्ग स्टेशनवर रुळावरून घसरले. तेथे कोणतीही जीवित वा वित्तहानी झालेली नाही. सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. आम्ही रेल्वे अधिकाऱ्यांशी समन्वय साधत आहोत आणि लवकरच मदत गाडी घटनास्थळी पोहोचेल. लुमडिंग दुर्घटनेत हेल्पलाइन क्रमांक 03674 263120, 03674 263126 जारी करण्यात आले आहेत.
8 coaches of Train 12520 Agartala –LTT Express derailed at Dibalong station near Lumding at 15:55 Hrs today. 𝐓𝐡𝐞𝐫𝐞 𝐡𝐚𝐬 𝐛𝐞𝐞𝐧 𝐧𝐨 𝐦𝐚𝐣𝐨𝐫 𝐜𝐚𝐬𝐮𝐚𝐥𝐭𝐲 𝐨𝐫 𝐢𝐧𝐣𝐮𝐫𝐲 𝐚𝐧𝐝 𝐚𝐥𝐥 𝐩𝐚𝐬𝐬𝐞𝐧𝐠𝐞𝐫𝐬 𝐚𝐫𝐞 𝐬𝐚𝐟𝐞.
— Himanta Biswa Sarma (@himantabiswa) October 17, 2024
We are coordinating railway authorities…
-
वर्ल्ड कप जिंकून हा क्रिकेटर ट्रेनने घरी परतला! "टीसीने पकडले असते पण बायकोने..." पहा काय घडलं? -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
लोकसभा अध्यक्षांच्या विरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फेटाळला; विरोधकांचा पराभव की लोकशाहीची परीक्षा? -
Epfo pension : 20 दिवस उलटूनही पेन्शन क्लेम होतोय रिजेक्ट? ही आहेत कारणे; वाचा ईपीएफओचा नवा नियम -
LPG Cylinder New Rule: गॅस सिलिंडर बुकिंगमध्ये बदल; ग्रामीण भागात आता 'इतक्या' दिवसांनी होणार बुकिंग -
Gold Price Forecast: सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ! 1 तोळा सोनं 2 लाखांचा टप्पा ओलांडणार? वाचा अंदाज -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
LPG gas connection ekyc : एलपीजी ग्राहकांनो! ई-केवायसी करा, अन्यथा गॅस मिळणे बंद; जाणून घ्या प्रोसेस -
मनोरंजन विश्वावर शोककळा! अवघ्या 27व्या वर्षी प्रसिद्ध कलाकाराचा संशयास्पद मृत्यू -
PM Kisan 22nd Installment आज कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 2 हजार रुपये; वेळ आणि स्टेटस तपासा -
Horoscope Today March 12, 2026 Marathi : गुरुवार ठरणार प्रगतीचा दिवस; वाचा तुमच्या राशीत काय आहे खास -
IPL 2026 Schedule: आयपीएलचे 15 दिवसांचे वेळापत्रक समजून घ्या; पहिल्या सामना RCB Vs हैदराबाद










Click it and Unblock the Notifications