वक्फ कायद्याअंतर्गत देशातील पहिली कारवाई; अनधिकृत मदरशावर पडला हातोडा, JCB लावून केला भुईसपाट
देशात वक्फ कायदा लागू झाल्यानंतर, मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यातील बेकायदेशीर मदरशांवर पहिली आणि सर्वात मोठी कारवाई करण्यात आली. अनधिकृत जागेवर चालविल्या जाणाऱ्या मदरशावर हातोडा पडला. एका स्थानिक व्यक्तीने भाजप प्रदेशाध्यक्ष आणि खासदार यांच्याकडे सरकारी जमिनीवर बेकायदेशीरपणे चालणाऱ्या मदरशाची तक्रार केली होती.

बजावली होती नोटीस
तक्रारीनंतर एसडीएमने मदरसा संचालकाला नोटीस बजावली होती. मात्र संचालकांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. सुरुवातीला या मदरशाला ग्रामपचंयातीची परवानगी असल्याचे सांगितले गेले. मात्र त्यानंतर हा परिसर महानगर पालिकेच्या आखत्यारित गेला. त्यानंतर हा मदरसा अनधिकृत असल्याचे सांगण्यात आले. हा मदरसा गेल्या वीस वर्षांपासून अनधिकृत जागेत सुरु होता. अखेर आता वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झाल्यानंतर मदरसा संचालकाने स्वतः इमारत पाडण्यासाठी मजूर पाठवले. कारण आता कायदा झाल्यानंतर, बेकायदेशीरपणे चालणाऱ्या आणि सरकारी जमिनीवर चालणाऱ्या मदरशांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
मदरशाबाबत होती तक्रार
काही दिवसांपूर्वी मुस्लिम समाजातील काही लोकांनी भाजप प्रदेशाध्यक्ष बी. डी. शर्मा यांची भेट घेऊन या मदरशाबद्दल तक्रार केली होती. त्याने सांगितले होते की पन्ना जिल्ह्यात बेकायदेशीरपणे मदरसे चालवले जात आहेत. बीडी शर्मा यांनी यावर चिंता व्यक्त केली होती. त्यांनी प्रशासनाशी बोलून बेकायदेशीरपणे चालणाऱ्या मदरशांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. यानंतर जिल्हा प्रशासनाने मदरसा संचालकाला नोटीस बजावली होती. मग मदरसा संचालकाने स्वतः जेसीबी आणि मजुरांना बोलावून मदरसा पाडला. मिळालेल्या माहितीनुसार, बायपास बीडी कॉलनीतील सरकारी जमिनीवर एक मदरसा बऱ्याच काळापासून सुरू होता. मदरशाच्या नावाखाली पैसे वसूल केले जात असल्याचा आरोप आहे. जेव्हा हे प्रकरण बीडी शर्मा यांच्यापर्यंत पोहोचले तेव्हा त्यांनी प्रशासनाला कारवाई करण्यास सांगितले.












Click it and Unblock the Notifications