रुपेरी पडदा ते किन्नर आखाडा.. अभिनेत्री ममता कुलकर्णी झाली महामंडलेश्वर, कारण काय?
एकेकाळी बाँलिवूड गाजविणारी प्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णीने आज संन्यास घेतला. नव्वदीच्या दशकातील या प्रसिद्ध अभिनेत्रीने आज कुंभमेळ्यात किन्नर आखाड्यात दिक्षा घेतली. ममता कुलकर्णी आता याच आखाड्याची महामंडलेश्वर बनणार आहे. तिने हा निर्णय का घेतला, हे मात्र समजले नाही.

ममताने घेतला संन्यास
ममता कुलकर्णीने कधीकाळी आपल्या सौंदर्याने सर्वांना वेड लावलं होतं. प्रसिद्धीच्या झोतात असताना ती अचानक सिनेसृष्टीतून गायब झाली. आता तब्बल २५ वर्षांनी ममता कुलकर्णी ही भारतात परतली आहे. ममता कुलकर्णी ही सध्या प्रयागराज महाकुंभला पोहोचली आहे. सध्या ममता कुलकर्णीचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात फोटोत ममता कुलकर्णी ही साध्वीच्या वेशात पाहायला मिळत आहे. तिने येथेच सन्यास घेतला आहे.
किन्नर आखाड्यात दिक्षा
ममता कुलकर्णीला किन्नर आखाड्याने पट्टाभिषेक करत महामंडलेश्वर ही उपाधी दिली. ती आता किन्नर आखाड्याची साध्वी म्हणून ओळखली जाणार आहे. साध्वी बनल्यावर ममता कुलकर्णी संगम, काशी आणि आयोध्येची वारी करणार आहे. याआधी तिचे काही फोटो समोर आले आहेत. या फोटोत ममता कुलकर्णीने अंगावर भगव्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहेत. त्यासोबतच गळ्यात रुद्राक्षाच्या माळा आणि खांद्यावर एक झोली लटकवलेल्या स्वरुपात दिसत आहे.
नावातही झाला बदल
ममताने आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर डॉ. लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांची भेट घेत त्यांचे आशीर्वाद घेतले. याचे फोटोही व्हायरल झाले. विशेष म्हणजे ममता कुलकर्णीने तिच्या नावातही बदल केला असून ती आता 'श्री यामाई ममता नंद गिरि' या नावाने ओळखली जाणार आहे. ममता कुलकर्णीने स्वत: इन्स्टाग्रामवर काही व्हिडीओ पोस्ट केले आहेत. येत्या २९ जानेवारीला मौनी अमावस्येला शाही स्नान करुन मी विश्वनाथ मंदिरात जाईन. यानंतर मी अयोध्येत जाऊन तिथे पिंडदान करेन, अशी माहिती ममता कुलकर्णीने दिली.












Click it and Unblock the Notifications