Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

दिल्लीचा पुढील CM कोण?, AAP नेते सौरभ भारद्वाज यांनी दिली महत्त्वाची अपडेट्स, वाचा सविस्तर

Delhi CM Arvind Kejriwal News : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार आहेत. तिहार तुरुंगातून बाहेर आल्यानंतर रविवारी 15 सप्टेंबर रोजी केजरीवाल यांनी दोन दिवसांत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून कोणीतरी नवा चेहरा असणार आहे. अशा परिस्थितीत दिल्लीचा पुढील नवा मुख्यमंत्री कोण असेल, हा सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो.

अरविंद केजरीवाल यांच्या निर्णयावर आम आदमी पार्टीचे (AAP) सौरभ भारद्वाज सोमवारी पत्रकार परिषद घेण्यासाठी आले असता त्यांना विचारण्यात आले की, दिल्लीचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार आहे? यावर सौरभ भारद्वाज म्हणाले की, तुमच्याइतकीच माहिती माझ्याकडे आहे. केजरीवाल यांच्या राजीनाम्यावरच विधीमंडळ पक्षाची बैठक होणार आहे.

Saurabh Bhardwaj

सौरभ भारद्वाज म्हणाले की, दिल्लीची जनता केजरीवाल यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवेल. दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि केजरीवाल यांची आज बैठक होणार असून, त्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या नव्या चेहऱ्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

देशाची पहिली निवडणूक प्रामाणिकपणाच्या नावावर लढवली जाईल

आपचे नेते सौरभ भारद्वाज म्हणाले, "इतिहासात असे कधीच घडले नाही की, एक विद्यमान मुख्यमंत्री तुरुंगातून बाहेर आल्यानंतर स्वत: घोषणा करतो की, तुम्ही मला प्रामाणिक मानत असाल तर मला मत द्या. देशातील ही पहिलीच निवडणूक असेल, ज्यामध्ये एक मुख्यमंत्री म्हणत आहेत की ही निवडणूक प्रामाणिकपणाच्या नावावर लढवली जाईल. तीही जेव्हा केंद्र सरकारसह सर्व एजन्सी, मग ती ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, सर्व एजन्सी मुख्यमंत्र्यांच्या मागे लागली आहेत त्यांची बदनामी करण्यात कोणतीही कसर सोडलेली नाही.

सौरभ भारद्वाज म्हणाले, भारतीय जनता पक्षाने 2 वर्षात जे काही केले आहे, तरीही मुख्यमंत्र्यांचा त्यांच्या लोकांवर आणि त्यांच्या प्रामाणिकपणावर विश्वास आहे. दिल्लीतील लोक इतके उत्सुक आहेत की निवडणुका व्हाव्यात आणि ते अरविंद केजरीवालांना मतदान करतील. केजरीवाल यांना पुन्हा मुख्यमंत्री पदावर विराजमान करतील.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+