प्रत्येकाने 16 मुलं जन्माला घालावीत, चंद्राबाबू यांच्या पाठोपाठ CM स्टालिन यांचे वादग्रस्त विधान
तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टालिन यांनी केलेल्या एका वक्तव्यावरुन, वाद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता वेळ आली आहे ती नवविवाहीत जोडप्यांनी 16 आपत्य जन्माला घालण्याची... असं म्हणत त्यांनी नव्या वादाला खतपाणी घातल्याचं बोललं जात आहे. याआधी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनीही असंच वादग्रस्त विधान केलं होतं. स्टालिन यांच्या या वक्तव्यानंतर अनेकांच्या भुवाया उंचावल्या आहेत.
नेमकं काय म्हणाले स्टालिन
चेन्नईमध्ये हिंदू धार्मिक संस्थेद्वारे आयोजित कार्यक्रमात स्टॅलिन यांनी नवविवाहीत जोडप्यांना एक सल्ला दिला. मुख्यमंत्री एम.के. स्टलिन यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमात 31 दाम्पत्यांचा सामुदायिक विवाह सोहळा पार पडला. त्यात बोलताना स्टॅलिन म्हणाले की, आता दाम्पत्यांनी 16 मुले जन्माला घालण्याची वेळ आली आहे. सीएम एम.के. स्टॅलिन यांनी मानव संसाधन आणि सामाजिक न्याय मंत्री शेखर बाबू यांचे भरभरून कौतुक केले.

चित्रपटाचाही दिला दाखला
मुख्यमंत्री स्टालिन म्हणाले की, कलैगनार यांनी खूप आधी चित्रपट पराशक्तीमध्ये एक संवाद लिहिला होता. त्यात म्हटलेलं की आम्ही मंदिराविरोधात नाही तर मंदिरं भयंकर पुरुषांचा तळ बनण्याच्या विरोधात आहोत. आपली लोकसंख्या कमी होत आहे आणि त्याचा परिणाम लोकसभा मतदारसंघांवरही पडेल. त्यामुळे आपण १६-१६ अपत्ये जन्माला का घालू नयेत.
या सोळा प्रकारच्या संपत्तीचाही उल्लेख
स्टॅलिन म्हणाले, पूर्वी नवविवाहित दाम्पत्यांना 16 प्रकारची संपत्ती मिळवण्यासाठी आशीर्वाद दिला जात होता. परंतु आता 16 पद्धतीची संपत्ती मिळण्याचा आशीर्वादाऐवजी 16 मुले जन्माला घालण्याचा आशीर्वाद देण्याची वेळ आली आहे. पूर्वी सांगण्यात येणारी 16 संपत्ती म्हणजे गाय, घर, पत्नी, संतान, शिक्षा, जिज्ञासा, ज्ञान, अनुशासन, भूमी, जल, आयु, वाहन, सोना, संपत्ती, धान्य आणि प्रशंसा होती. परंतु आता संतान प्राप्त होण्याचा आशीर्वाद दिला जावा, असंही स्टॅलिन यांनी स्पष्ट केलं.












Click it and Unblock the Notifications