Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

काय होते राम मंदीर प्रकरण..? ज्यामुळे वाढली होती अडवाणींची प्रतिष्ठा

Life journey of LK Advani- भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांची तब्येत बिघडली आहे. त्यांना दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लालकृष्ण आडवाणी सध्या 97 वर्षांचे असून गेल्या काही दिवसांपासून ते सारखे आजारी असतात. आज सकाळी पुन्हा त्यांना तातडीने रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. लालकृष्ण आडवाणी यांचा जिवनप्रवास राजकारणात प्रेरणादायी राहीलेले आहे. कसे होते त्यांचे आयुष्य याच विषयी आपण जाणून घेऊयात...

LK Advani

चार महिन्यांत चौथ्यांदा रुग्णालयात

लालकृष्ण आडवाणी यांचे वय सध्या 97 वर्षांचे आहे. त्यामुळे त्यांना आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. गेल्या चार-पाच महिन्यांत त्यांना चार वेळा रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून त्यांची प्रकृती नाजून असल्याचे सांगितले जातेय. अपोलो रुग्णालयात त्यांच्यावर डाँक्टरांच्या टीम उपचार करत आहे. लवकरच हाँस्पिटल त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती देतील, असे सांगण्यात आले आहे.

घरी जाऊन दिला होता 'भारत रत्न'

लालकृष्ण आडवाणी मागच्या काही काळापासून आरोग्याशी संबंधित समस्यांनी त्रस्त आहेत. त्यामुळेच ते घरी असतात, कुठल्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होत नाहीत. आडवाणी यांना यावर्षी देशातील सर्वोच्च सम्मान 'भारत रत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. पण आरोग्याशी संबंधित समस्यांमुळे ते राष्ट्रपती भवनात पुरस्कार स्वीकारण्यासाठी येऊ शकले नाहीत. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आदींच्या उपस्थितीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांच्या घरी जाऊन 'भारत रत्न' पुरस्कार प्रदान केला होता.

राजकीय जीवन प्रेरणादायी

१९५१ साली जनसंघाची स्थापना झाली. तेव्हापासून १९५७ पर्यंत आडवाणी यांनी जनसंघाचे सचीव म्हणून काम केले होते. त्यानंतर ते जनसंघाचे अध्यक्षही होते. पुढे १९८० साली भाजपची स्थापना झाली. तेव्हापासून १९८६ पर्यंत ते पक्षाचे सरचिटणीस होते. त्यानंतर १९८६ ते १९९१ पर्यंत ते भाजपचे अध्यक्ष होते.

राम मंदीरात होता मोलाचा वाटा

१९९० म्ध्ये लालकृष्ण आडवाणी यांच्या पुढाकाराने अयोध्येतील राम मंदिरासाठी त्यांनी आंदोलन सुरु केलं. त्यासाठी आडवाणी यांनी सोमनाथ ते अयोध्या रथयात्रा काढली. त्यांच्या या यात्रेत हिंदू समाजाचा चांगला पाठींबा मिळाला. या यात्रेदरम्यान त्यांना अटकही झाली होती. त्या अटकेनंतरच त्यांचे राजकीय वजन अजून वाढलं.

कसा होता राजकीय प्रवास

आडवाणी तीनदा भाजपचे अध्यक्ष होते. चार वेळा ते राज्यसभेचे खासदारही राहिले आहेत. पाच वेळा ते लोकसभेवरही निवडणून गेले आहेत. १९७७ ते १९७९ या काळात ते केंद्र सरकारमध्ये माहिती व प्रसारण खात्याचे कॅबिनेट मंत्रीही होते. १९९१ मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या पहिल्या सरकारमध्ये ते गृहमंत्री होते. २००२ मध्ये वाजपेयी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात ते उपपंतप्रधान झाले होते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+