बापरे! भाजपला 1 वर्षात मिळाली 2 हजार 243 कोटींची देणगी! जाणून घ्या कोणत्या पक्षाला किती मिळाली देणगी
ADR Report BJP received donations Rs 2,243 crore in 1 year : भाजप जगातील सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावा या पक्षाचे नेते करतात, भाजप सलग तिसऱ्या टर्ममध्येही सत्तेत आहे. देशात सध्या भाजपचाच दबदबा पाहायला मिळतो. या पक्षाने आपली ब्रँडींग एवढी करुन ठेवली की, त्यांच्याजवळपास सध्या तरी कोणताच पक्ष पोहचू शकत नाही.अफाट खर्चही या पक्षाने ब्रँडींग आणि जाहीरातींवर केलेला निवडणुकीतील खर्चाच्या आकडेवारीवारीतून स्पष्ट होते हा खर्च अफाट असल्याचे बोलले जाते.
हे जरी खरे असले तरीही त्यापेक्षा मोठी गोष्ट म्हणजे हा पैसा येतो कुठून तर..देणगीदारांकडून मग ते उद्योग, राजकारण, बाॅलीवूडपासून तर वैयक्तिक व्यक्तींपर्यंत ही यादी लांबलचक आहे. हे फक्त भाजपच्याच नव्हे तर सर्वच पक्षांच्या बाबतीत आहे. सर्वच पक्ष आपले आर्थिक भांडार वाढावे यासाठी प्रयत्नशील असतात पण सत्तेत जो पक्ष असतो त्याला फार महत्व असते म्हणूनच एकंदरीत विचार केल्यास भाजपला एक वर्षात किती देणगी मिळाली हे ऐकून तुम्ही आश्चर्यचकीत व्हाल...

2023-24 आर्थिक वर्षात किती मिळाली भाजपला देणगी?
'असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स' (एडीआर) या निवडणुकीशी संबंधित संस्थेने आपल्या अहवालात माहिती दिली आहे. त्यानुसार, भारतीय जनता पक्षाला 2023-24 या आर्थिक वर्षात सर्वाधिक 2243 कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे. देशातील राष्ट्रीय राजकीय पक्षांमध्ये हे प्रमाण सर्वाधिक आहे. हा अहवाल निवडणूक आयोगाला सादर केलेल्या आकडेवारीवर आधारित आहे. या आकडेवारीत 20 हजार रुपयांपेक्षा जास्त राजकीय देणग्या असल्याची माहिती देण्यात आली आहे.
राष्ट्रीय पक्षांना मिळालेल्या एकूण घोषित देणग्या किती?
या संस्थेच्या अहवालानुसार, राष्ट्रीय पक्षांना मिळालेल्या एकूण घोषित देणग्या 2544.28 कोटी होत्या. राष्ट्रीय पक्षांना मिळालेल्या घोषित देणग्यांची एकूण रक्कम 2,544.28 कोटी रुपये आहे, जी 12,547 देणगीदारांकडून प्राप्त झाली आहे. हा आकडा गेल्या वर्षीच्या तुलनेत 199 टक्क्यांनी अधिक आहे. विशेष म्हणजे या आर्थिक वर्षाच्या अखेरीस निवडणुका होत्या. त्यामुळे देणगीदारांच्या रकमेचा एकूण टक्का वाढलेला दिसतो.
एकूण देणगीत भाजपचा वाटा किती? (ADR अहवालानुसार)
प्राप्त माहितीनुसार, एकूण घोषित देणग्यांपैकी 88 टक्के देणगी एकट्या भाजपची आहे. 1,994 देणग्यांमधून 281.48 कोटी रुपयांच्या देणग्या घेऊन काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर आहे पण हा टक्का भाजपपेक्षा खूपच कमी आहे. आम आदमी पार्टी (AAP), कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) आणि नॅशनल पीपल्स पार्टी (NPEP) यांनी कमी रकमेची नोंद केली.
- गेल्या 18 वर्षांच्या फाइलिंगनुसार, काँग्रेसच्या देणग्या गेल्या वर्षीच्या तुलनेत 252.18 टक्क्यांनी वाढल्या.
- भाजपला मिळालेल्या देणग्या आर्थिक वर्ष 2022-23 मधील 719.858 कोटी रुपयांवरून 2023-24 या आर्थिक वर्षात 2,243.94 कोटी रुपयांपर्यंत वाढल्या.
- भाजपच्या देणगीत 211.72 टक्क्यांची वाढ दिसून आली.
- काँग्रेसला मिळालेल्या देणग्या आर्थिक वर्ष 2022-23 मधील 79.924 कोटी रुपयांवरून 2023-24 मध्ये 281.48 कोटी रुपयांपर्यंत वाढल्या.
- काँग्रेसला मिळालेल्या देणग्यात 252.18 टक्क्यांनी वाढ झाली आहे.












Click it and Unblock the Notifications