केदारनाथमध्ये दरड कोसळली! महाराष्ट्र, गुजरातचे यात्रेकरु ढिगाऱ्याखाली दबले, 3 मृतदेह काढले बाहेर
नवी दिल्ली - केदारनाथ पादचारी मार्गावर रविवारी सकाळी भीषण अपघात झाला. येथे येत असलेल्या ढिगाऱ्यांमुळे अनेक प्रवासी ढिगाऱ्याखाली दबल्याचे वृत्त आहे. महाराष्ट्र, गुजरातचे काही यात्रेकरु ढिगाऱ्याखाली गाडले गेले असून तीन मृतदेह बाहेर काढण्यात यंत्रणेला यश आले आहे.
सकाळी घडली दुर्घटना..
आज सकाळी साडेसात वाजता केदारनाथ येथे पादचारी मार्गावर ही दु्र्घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. काही यात्रेकरुंवर पहाडावरील दगड पडले. ही माहिती समजल्यानंतर यंत्रणा घटनास्थळी पाठवले. त्यावेळी तिघे मृत तर पाच व्यक्ती जखमी अवस्थेत होते. या घटनेत पाच जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये तीन गुजरातमधील तर दोन महाराष्ट्रातील आहेत. जखमींना गौरीकुंड येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे
आठ जण काढले ढिगाऱ्याखालून
दरम्यान, घटनास्थळी एनडीआरएफ, डीडीआर वायएमएफ प्रशासनाचे पथक पोहोचले आहे, ते मदत कार्य जोमाने करीत आहेत. आतापर्यंत आठ जखमींना ढिगाऱ्यातून बाहेर काढले असून त्यांना रुग्णालयात नेण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. यात महाराष्ट्र आणि गुजरातचे यात्रेकरु असल्याचे वृत्त आहे.

ही आहेत मृतांची नावे
- किशोर अरुण पराते (रा. नागपूर, महाराष्ट्र, वय 31 वर्षे)
- अनुराग बिष्ट (तिलवाडा, रुद्रप्रयाग)
- सुनील महादेव काळे (रा. जालना, महाराष्ट्र, वय 24 वर्षे)
जखमींची नावे
- चेला भाई चौधरी (गुजरात, वय 23 वर्षे)
- जगदीश पुरोहित (गुजरात, वय 45 वर्षे)
- अभिषेक चौहान (महाराष्ट्र, वय 18 वर्षे)
- धनेश्वर दंडे, महाराष्ट्र (वय 27 वर्षे)
- हरदाना भाई पटेल (गुजरात)

सीएम धामी यांच्याकडून शोक
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. "केदारनाथ यात्रा मार्गाजवळील टेकडीवरून ढिगारा आणि मोठमोठे दगड पडले, काही यात्रेकरूंचा मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे, याबाबत मी अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात आहे. अपघातात जखमी झालेल्यांना तातडीने चांगले उपचार देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. देव दिवंगतांच्या आत्म्यास शांती देवो आणि शोकाकुल कुटुंबीयांना हे अपार दु:ख सहन करण्याची शक्ती देवो"
केदारनाथ यात्रा मार्ग के पास पहाड़ी से मलबा व भारी पत्थर गिरने से कुछ यात्रियों के हताहत होने का समाचार अत्यंत दुःखद है। घटनास्थल पर राहत एवं बचाव कार्य जारी है, इस सम्बन्ध में निरंतर अधिकारियों के संपर्क में हूं। हादसे में घायल हुए लोगों को त्वरित रूप से बेहतर उपचार उपलब्ध…
— Pushkar Singh Dhami (@pushkardhami) July 21, 2024












Click it and Unblock the Notifications