दिल्लीत 'हाता'विना 'झाडू'; अरविंद केजरीवाल दिल्ली विधानसभा स्वबळावर लढणार, 'ही' आहेत कारणे
Delhi Assembly Election- दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज आम आदमी पार्टीने मोठी घोषणा केली. अरविंद केजरीवाल यांनी या निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा नारा दिल्याने, हा काँग्रेससाठी मोठा धक्का समजला जात आहे. इंडिया आघाडीतील नाराजी यामुळे पुन्हा एकदा समोर आली असून आता काँग्रेसलाही दिल्ली विधानसभेची निवडणूक स्वतंत्र लढावी लागणार आहे.

केजरीवालांचा स्वबळाचा नारा
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसवरचा राग पुन्हा दाखवला. दिल्ली विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा आज केजरीवालांनी केली. आपल्या एक्स या सोशल मिडिया अकाऊंटवर त्यांनी ही माहिती दिली. आम आदमी पक्ष दिल्लीत स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी एक्स मीडियातील पोस्टमध्ये म्हटलं. आपल्या पोस्टमध्ये ते म्हणाले की, "आम आदमी पक्ष दिल्लीत स्वबळावर निवडणूक लढविणार आहे. काँग्रेससोबत कोणत्याही प्रकारची युती होण्याची शक्यता नाही".
Aam aadmi party will be fighting this election on its own strength in Delhi. There is no possibility of any alliance with congress. https://t.co/NgDUgQ8RDo
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) December 11, 2024
पवाराची मध्यस्थीही अपयशी
यापूर्वी काल म्हणजेच मंगळवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीची बैठक झाली. या बैठकीत आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे बोलले जात होते. काँग्रेस आणि आपमध्ये युती होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, आज अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा दिल्ली विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढणार असल्याची भूमिका जाहीर केली.
आपच्या दोन याद्या जाहीर
आम आदमी पक्षानं दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर केल्या आहेत. पहिल्या यादीत पक्षानं 11 जागांसाठी उमेदवार जाहीर केले. तर दुसऱ्या यादीत सोमवारी 20 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. आम आदमी पक्षाकडून दिल्लीत विधानसभा निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरू आहे. केजरीवाल हे जनतेमध्ये जाऊन त्यांचे मत जाणून घेत आहेत. आम आदमी पार्टीने दिल्लीत पुन्हा सरकार बनवल्यास सर्व वाहन मालकांसाठी केजरीवाल यांनी 5 हमी योजना जाहीर केल्या आहेत.
वाहनचालकांसाठी हमी योजना
आम आदमी पार्टीने दिल्लीत पुन्हा सरकार बनवल्यास सर्व वाहन मालकांसाठी केजरीवाल यांनी 5 हमी योजना जाहीर केल्या आहेत. त्यात प्रत्येक ड्रायव्हरसाठी 10 लाख रुपयांपर्यंतचा जीवन विमा आणि 5 लाख रुपयांचा अपघात विमा, मुलीच्या लग्नासाठी 1 लाख रुपयांची मदत, वर्षातून दोनदा गणवेशासाठी 2500 रुपये, स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी प्रशिक्षणाचा खर्च उचलणार, 'Ask App' रीस्टार्ट होणार आहे अशा योजनांचा समावेश आहे.












Click it and Unblock the Notifications