amanotullah khan :'ईडी मला अटक करायला माझ्या घरी पोहोचलीयं..! आप आमदार अमानतुल्ला खान यांचा व्हिडिओ
AAP MLA Amanatullah Khan News Update : आम आदमी पक्ष ओखला, दिल्ली इथले आमदार अमानतुल्ला खान यांच्या अडचणीत आणखी वाढ होताना दिसत आहे. वक्फ बोर्ड प्रकरणाच्या तपासासंदर्भात अंमलबजावणी संचालनालय (ईडी) सोमवारी सकाळी 6.30 वाजता खान यांच्या घरावर छापा टाकण्यासाठी पोहोचली.
ED टीम जेव्हा अमानुतुल्ला खान यांच्या घरी पोहचली तेव्हा त्यांनी पथकाला घरात येण्यापासून अडवलं त्यामुळे स्थानिक पोलिसांना बोलवण्यात आलं. त्याचवेळी, अमानतुल्ला खान यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर ट्विट केले आणि सांगितलं की ईडी मला अटक करण्यासाठी माझ्या घरी पोहोचले आहे.
काय म्हणाले अमानुतुल्ला खान?
पुढे X वर एक व्हिडिओ जारी करताना aap mla amanotullah khan यांनी त्यात म्हटले आहे की, सकाळचे 7 वाजले आहेत. सर्च वॉरंटच्या नावाखाली ईडी मला अटक करण्यासाठी माझ्या निवासस्थानी आली आहे. माझ्या सासूबाईंना कॅन्सर झाल्याचे निदान झाले आहे. चार दिवसांपूर्वी त्यांचे ऑपरेशन झाले. त्याही माझ्या घरी आहे. मी त्यांना (ईडी) पत्र लिहिले आहे आणि प्रत्येक नोटीसला मी उत्तर दिले आहे. मला अटक करून आमचे कार्य बंद पाडणे हाच त्यांचा उद्देश आहे.
#WATCH | AAP MLA Amanatullah Khan says "It is 7 AM right now. ED has come to my residence to arrest me in the name of a search warrant. My mother-in-law has been diagnosed with cancer. She had an operation four days ago. She is also at my house. I have written to them (ED) and I… https://t.co/cbjFYDnRh5 pic.twitter.com/xFrJkN5pol
— ANI (@ANI) September 2, 2024
दोन वर्षांपासून छळाचा आरोप
हे लोक गेल्या दोन वर्षांपासून त्याचा छळ करत असल्याचा आरोपही खानने केला आहे. माझ्यावर खोटे खटले लावले. ते फक्त माझ्यासाठीच नाही तर माझ्या संपूर्ण पक्षासाठी रोज काही ना काही समस्या निर्माण करत आहेत. आम्ही त्यांच्यापुढे झुकणार नाही आणि त्यांना घाबरणार नाही, ते आम्हाला जेलमध्ये पाठवतील. याआधी न्यायालयात जसा न्याय मिळाला तसाच या वेळीही न्याय मिळेल, अशी आशा आहे. असंही अमानुतुल्ला खान यांनी म्हटलं आहे.
ED की निर्दयता देखिये @KhanAmanatullah पहले ED की जाँच में शामिल हुए उनसे आगे के लिए समय माँगा, उनकी Mother In Law को कैंसर है उनका ऑपरेशन हुआ है घर में सुबह सुबह धावा बोलने पहुँच गये।@KhanAmanatullah के ख़िलाफ़ कोई सबूत नहीं है लेकिन मोदी की तानाशाही और ED की गुंडागर्दी दोनों… pic.twitter.com/GyhduaghJB
— Sanjay Singh AAP (@SanjayAzadSln) September 2, 2024
'मोदींची हुकूमशाही आणि ईडीची गुंडगिरी' -संजय सिंह
'आप'चे खासदार संजय सिंह यांनी एक व्हिडीओ शेअर करत ईडीचा निर्दयीपणा पाहिला असं म्हटलं आहे. खान प्रथम ईडीच्या तपासात सहभागी झाले आणि त्यांनी इडीकडं आणखी वेळ मागितला आहे. त्यांची सासू कर्करोगानेग्रस्त आहे आणि त्यांची शस्त्रक्रियाही झाली आहे.
या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून इडी छापा टाकण्यासाठी पहाटेच खान यांच्या घरी पोहोचले. आमदार खान विरुद्ध कोणताही पुरावा नाही, पण मोदींची हुकूमशाही आणि ईडीची गुंडगिरी दोन्ही सुरूच आहे. असंही संजय सिंह यांनी म्हटलं आहे.
#WATCH दिल्ली: आम आदमी पार्टी के विधायक अमानतुल्लाह खान के आवास पर ED की छापेमारी पर AAP नेता संजय सिंह ने कहा, "भले ही सुप्रीम कोर्ट से ED को बार-बार लताड़ मिल रही हो... बावजूद इसके आज आम आदमी पार्टी के विधायक अमानतुल्लाह खान के आवास पर ED सुबह-सुबह छापा मारने पहुंच गई... दरअसल… pic.twitter.com/ZwU8uDoq41
— ANI_HindiNews (@AHindinews) September 2, 2024













Click it and Unblock the Notifications