कोण आहे अरविंद केजरीवाल यांचा जावई ? मुलीच्या लग्नात पत्नींसोबतचा त्यांचा डान्स व्हिडीओ व्हायरल
Arvind kejriwal daughter wedding: दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांची मुलगी हर्षिता हिचा गुरुवारी संभव जैनसोबत विवाह झाला. प्रथम साखरपुडा आणि मेहंदी सोहळा दिल्लीतील शांग्री-ला हॉटेलमध्ये पार पडला. या विवाह सोहळ्यानंतर रिसेप्शन सोहळा २० एप्रिल रोजी होण्याची शक्यता आहे,
केजरीवाल यांची मुलगी हर्षिता हिचा विवाह मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. कुटुंबातील सदस्य, मित्र परिवार आणि आप नेत्यांव्यतिरिक्त या लग्न समारंभाला फक्त निवडक लोक उपस्थित होते. मुलगी हर्षिताच्या साखरपुड्याच्या समारंभात वडील अरविंद केजरीवाल हे खास अंदाजात दिसले.

अरविंद केजरीवाल यांचा पुष्पा स्टाईल डान्स
अरविंद केजरीवाल त्यांच्या मुलीच्या साखरपुड्यात पुष्पा-2 चित्रपटातील 'अंगारों का अंबर सा लगता है मेरा सामी...' या प्रसिद्ध गाण्यावर पत्नी सुनीतासोबत स्टेजवर डान्स करताना दिसले. या व्हिडिओमध्ये केजरीवाल 'पुष्पा 2' चित्रपटातील गाण्यावर अतिशय रोमँटिक स्टाइलमध्ये डान्स करताना दिसत आहेत. केजरीवालांचा हा अंदाज पाहून सर्वजण थक्क झाले आहेत. केजरीवाल यांचा हा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
अरविंद केजरीवाल का इससे ज़्यादा Cute वीडियो आज तक नहीं देखा होगा।♥️🥰 pic.twitter.com/QkC5OnTi24
— Anahat🇮🇳 (@AnahatSagar) April 18, 2025
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पत्नी हर्षिता आणि संभव जैन यांच्यासोबत भांगडा केला. भगवंत सिंह मान आणि त्यांची पत्नी गुरप्रीत कौर यांनीही या सोहळ्यात सामील होऊन 'नची जो सादे नाल'च्या सुरात भांगडा केला. कुटुंब आणि मित्रमंडळी या लग्नात एन्जॉय करताना दिसले. या विवाह सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत.
अरविंद केजरीवाल यांचे जावई कोण आहेत?
संभव जैन यांनी आयआयटी दिल्लीतून इंजिनीअरिंग केले आहे. संभव जैन आणि हर्षिता केजरीवालने केमिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे. संभव जैन हे एका मोठ्या कन्सल्टन्सी कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट आहेत आणि त्यांनी अलीकडेच हर्षितासोबत एक स्टार्टअप सुरू केले आहे.
हर्षिता केजरीवाल शिक्षण
अरविंद केजरीवाल यांची मुलगी हर्षिता केजरीवाल हिने तिचे शालेय शिक्षण नोएडाच्या डीपीएसमधून घेतले. २०१४ मध्ये आयआयटी अॅडव्हान्स्ड परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, त्यांनी आयआयटी दिल्लीमधून केमिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली. हर्षिताने 2018 मध्ये आपली पदवी पूर्ण केल्यानंतर बिझनेस आणि उद्योजकतेच्या क्षेत्रात पाऊल ठेवले टाकलं आहे. तसेच हर्षिताला एक लहान भाऊ असून त्याचं नाव पुलकित आहे, तो सध्या आयआयटी दिल्लीत शिक्षण घेत आहे.
-
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!







Click it and Unblock the Notifications