Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

दिल्ली विधानसभा निवडणूक..! 'आप'चे स्टार प्रचारक ठरले; वाचा, कुणाला मिळाली संधी? कोण दुर्लक्षित?

दिल्लीतील 70 विधानसभा मतदारसंघासाठी येत्या 5 फेब्रुवारीला मतदान पार पडणार आहे. त्यानंतर 8 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगानं निवडणुकीची घोषणा केल्यानंतर दिल्लीत राजकीय हालचाली जोरात सुरू आहेत. या निवडणुकीसाठी आपने आपल्या स्टार प्रचारकांची यादी आज जाहीर केली.

Aam Aadmi Party star campaigner

आपचे 40 स्टार प्रचारक

दिल्ली विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोरात सुरू आहे. आम आदमी पार्टीनं दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. या स्टार प्रचारकांच्या यादीत अरविंद केजरीवाल यांच्यासह दिल्ली आणि पंजाबमधील पक्षाच्या प्रमुख नेत्यांची नावे आहेत. या यादीत पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांचं नाव पहिल्या क्रमांकावर आहे. सुनीता केजरीवाल यांचं नाव नवव्या क्रमांकावर आहे. निवडणुकीपूर्वी पक्षात प्रवेश करणारे शिक्षणतज्ज्ञ अवध ओझा यांचंही नाव या यादीत टाकण्यात आले आहे.

मालवीय यांचं नाव वगळलं

आम आदमी पार्टीनं दिल्ली आणि पंजाबमधील अनेक मंत्री आणि खासदारांना दिल्लीच्या विधानसभा निवडणूक प्रचारात उतरवलं आहे. या स्टार प्रचारकांची यादी पक्षानं निवडणूक आयोगाला पाठवली आहे. यापूर्वी लोकसभा व हरियाणा विधानसभा निवडणुकीत न दिसलेला हरभजन सिंग दिल्ली विधानसभेसाठी स्टार प्रचारकांच्या यादीत आहे. आम आदमी पार्टीच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल मागील काही महिन्यांपासून एकाकी पडल्या आहेत. तत्कालीन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी त्यांच्याशी गैरवर्तन आणि हाणामारीची घटना घडल्याचा त्यांनी आरोप केला. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे त्यांचे नाव या यादीत नाही.

कोण आहेत स्टार प्रचारक

आम आदमी पार्टीनं जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत पहिल्या पाच नावांमध्ये अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री आतिशी, भगवंत मान, सुनीता केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि संजय सिंह यांचा समावेश आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात दोन वर्षांपासून तिहार तुरुंगात असलेल्या सत्येंद्र जैन यांचं नाव या यादीत समाविष्ट असल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. खासदार राघव चढ्ढा यांचं नावही स्टार प्रचारकांच्या यादीत आहे. त्यांच्यासह मंत्री सौरभ भारद्वाज, गोपाल राय, खासदार संदीप पाठक, पंकज गुप्ता आदींची नावं या यादीत आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+