Aadhaar card : आधार कार्डमधील फोन नंबर, नाव आणि पत्ता किती वेळा बदलता येतो; कसा बदलायचा? घ्या जाणून
Aadhaar card update rules : आधारकार्ड हे आपल्या ओळखीचा महत्वाचा पुरावा आणि आधार बनला आहे. हे कार्ड आपल्याकडे असेल तर सरकारी असो वा निमशासकीय आणि खासगी ठिकाणी पुरावा म्हणून वापरता येते. आधारकार्ड भारतीय नागरीकांचे अधिकृत ओळखपत्र आहे, पण आधारकार्ड अनेकदा अपडेट नसते किंवा त्यात चुका असतात.
आधारकार्डमध्ये बऱ्याचदा फोन नंबर, नाव पत्ता आणि इतर माहिती चुकलेली दिसते. ही माहिती आपण वेळेवर जर दुरुस्त केली नाही तर ओळखपत्राशी संबंधित कामे अडकू शकतात. अशातच आधारकार्डमधील माहितीही सत्य आणि योग्य आहे की नाही हे पाहणे आधारकार्ड धारकांची जबाबदारी असते जर तशी माहिती नसेल तर संभाव्य अडथळे येऊ नये म्हणून तुम्हाला तुमचे आधारकार्ड अपडेट करणे क्रमप्राप्त आहे.

आधार कार्डमध्ये वेळोवेळी माहिती अपडेट करण्याची आवश्यकता असू शकते, आणि चुकीची माहिती बरोबर करण्याची गरज अशते पण तुम्हाला माहिती आहे का की आधारमध्ये काही माहिती अपडेट करण्यासाठी मर्यादा आहेत? हे जर तुम्हाला माहित नसेल तर आम्ही सांगतो चला जाणून घेऊ याविषयी सर्व...
आधार कार्ड अपडेट करण्याचे नियम
आधार कार्डमधील माहिती अपडेट करणे ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. यामुळे तुमची ओळख आणि संपर्क माहिती नेहमीच बरोबर राहील. तुमची माहिती नियमितपणे तपासा आणि गरजेनुसार ती अपडेट करा.
आधार कार्ड अपडेट नियम
नावात बदल करण्याची मर्यादा किती आहे?
तुम्ही आधार कार्डमध्ये तुमचे नाव फक्त दोनदा अपडेट करू शकता.
प्रक्रिया : नाव बदलण्यासाठी तुम्हाला पासपोर्ट, पॅन कार्ड किंवा इतर सरकारी प्रमाणपत्रे यासारखी वैध कागदपत्रे सादर करावी लागतील.
आधार कार्डवरील जन्मतारीख कितीदा अपडेट करु शकतो?
जन्मतारीख बदलण्याची परवानगी फक्त एकदाच आहे.
प्रक्रिया : यासाठी तुम्हाला जन्म प्रमाणपत्र किंवा दहावीच्या गुणपत्रिका यासारखी कागदपत्रे सादर करावी लागतील.
आधारकार्डवरील लिंग या बाबीत कितीवेळा बदल करता येतो?
आधारकार्डवर तुम्ही पुरुष आहात की, स्त्री अथवा तृतीयलिंगी ही माहिती माहिती फक्त एकदाच बदलता येते.
प्रक्रिया : यासाठी, तुम्हाला आवश्यक कागदपत्रांसह जवळच्या आधार नोंदणी केंद्राला भेट द्यावी लागेल.
आधारकार्डवरील पत्ता कितीदा बदलता येतो?
पत्ता बदलण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही; तुम्ही तो कितीही वेळा अपडेट करू शकता.
प्रक्रिया : तुम्ही UIDAI च्या सेल्फ-सर्व्हिस पोर्टल (ssup.uidai.gov.in) द्वारे पत्ता ऑनलाइन अपडेट करू शकता किंवा प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जवळच्या आधार सेवा केंद्राला भेट देऊ शकता.
आधार कार्डवर मोबाईल नंबर कितीदा अपडेट करु शकतो?
आधार कार्डवर मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी कोणतीही विशिष्ट मर्यादा नाही; गरजेनुसार तुम्ही ते बदलू शकता.
प्रक्रिया : मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी तुम्हाला जवळच्या आधार नोंदणी केंद्राला भेट द्यावी लागेल.
ही माहिती तुमच्यासाठी आहे खास
जर तुम्हाला नाव, जन्मतारीख किंवा लिंग निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त बदलायचे असेल तर तुम्हाला UIDAI च्या प्रादेशिक कार्यालयाशी संपर्क साधावा लागेल. यासाठी, तुम्हाला योग्य कारणे आणि सहाय्यक कागदपत्रे सादर करावी लागतील. तुम्ही [email protected] या ईमेल पत्त्यावर देखील संपर्क साधू शकता.
'आधार'मधील माहिती अपडेट करण्यासाठी वैध कागदपत्रे आवश्यक आहेत. तुमची विनंती मंजूर होण्यासाठी अपडेट प्रक्रियेदरम्यान योग्य कागदपत्रे सादर करा. अधिक माहिती आणि ऑनलाइन अपडेटसाठी तुम्ही UIDAI च्या अधिकृत वेबसाइट (uidai.gov.in) ला देखील भेट देऊ शकता.
-
बिहारमध्ये 'निशांत' पर्व?, CM नितीश कुमार यांच्या मुलाची राजकीय एंट्री, 50व्या वर्षीही अविवाहित का? -
IND vs ENG: हारता हारता जिंकला भारत! मॅजिक ओव्हर, 6 बॉलमध्येच इंग्लंडचा गेम; 'हा' खेळाडू ठरला हिरो -
IND vs ENG Semifinal : आज भारत-इंग्लंडमध्ये सेमीफायनल; मॅच कुठे पाहू शकता Live, वाचा सर्व डिटेल्स -
Nitish kumar resigns : मोठी बातमी! नितीशकुमार मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार; काय आहे कारण? वाचा -
शिंदेंचं सोलापूर 'कार्ड' अन् आंबेडकरी चेहऱ्याला संधी; राज्यसभेत ज्योती वाघमारेंना संधी, वाचा सविस्तर -
बिहारच्या राजकारणात 'नितीश' युगाचे नवे पाऊल; राज्यसभेच्या रिंगणात CM, शहांनी फुंकले विजयाचे रणशिंग! -
भारताला तेल खरेदी करण्यासाठी कोणाच्याही 'परवानगी'ची गरज नाही, विषय संपला ! -
IND vs NZ Final: भारत रचणार इतिहास! फायनलमध्ये 'या' 2 स्टार खेळाडूंचा पत्ता कट होणार? कारण काय, वाचा -
महाराष्ट्राला मिळाले नवे राज्यपाल! जिष्णू देव वर्मा यांच्याकडे राज्याची धुरा; वाचा त्यांच्याबद्दल -
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! 'एवढ्या' लाखांचे कर्ज माफ होणार! काय स्वस्त काय महाग यादी पहा -
Women's Day 2026: केवळ मेसेज नको, द्या 'हे' खास सरप्राईज! महिला दिनासाठी स्वस्त 5 हटके गिफ्ट आयडियाज -
Mumbai Heatwave Alert : मुंबईकरांनो सावधान! मार्चमध्येच तापमान वाढले; 'या' जिल्ह्यांना IMDचा इशारा






Click it and Unblock the Notifications