Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मोठी बातमी : चेंगराचेंगरीनंतर आता कुंभमेळ्यात भीषण आग; अनेक तंबू जळाले तर...

प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यामध्ये चेंगराचेंगरी होऊन 25 जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, आता मोठी आग लागल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे भाविकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. आग विझवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलं आहे. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, आग अद्यापही आटोक्यात आलेली नाही. महाकुंभमध्ये एकामागून एक दुर्घटना घडत असल्याने भक्तांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

Kumbh Mela 2025

मंडपांना लागली आग

महाकुंभच्या सेक्टर २२ मधील मंडपांना आग लागली आहे. सध्या अग्निशामक दलाचे पथक आगीवर नियंत्रण मिळवत आहे. मात्र अद्याप आग आटोक्यात आलेली नाही. घटनास्थळी एकही भाविक मंडपात नव्हता. त्यामुळे सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झाली नाही. आग लागल्याबरोबर सर्वजन बाहेर पडले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

नेमके काय झाले

मिळालेल्या माहितीनुसार महाकुंभच्या सेक्टर २२ मध्ये छतनाग घाट आणि झुशीच्या नागेश्वर घाट यामधील काही तंबूत आग लागली. आजुबाजूचे सर्व तंबू जळू लागले. हे समजताच भाविक मंडपातून बाहेर आले. ही माहिती अग्निशामक दलाला सांगण्यात आली. त्यानंतर अग्नीशामक दल तत्काळ घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी आग विझविण्याचे प्रयत्न सुरु केले. महाकुंभमेळ्यात आग लागण्याची ही दुसरी घटना आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+