धक्कादायक..! 4 वर्षांत 64 जणांकडून अत्याचार; तेराव्या वर्षांपासून मुलीसोबत होत होते असे काही...
नुकतीच वयाची अठरा वर्ष पूर्ण झालेल्या एका किशोरवयीन मुलीच्या दाव्याने सध्या देशभर खळबळ उडाली आहे. ही विद्यार्थीनी क्रिडापटू असून आपल्यावर गेल्या चार वर्षात ६४ जणांनी लैंगिक अत्याचार केल्याचा दावा तिने केल्या आहे. म्हणजेच वयाच्या १३ व्या वर्षापासून या विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार होत असल्याचे तिचे म्हणणे आहे. या प्रकारानंतर चांगलीच चर्चा सुरु झाली आहे.

कोठे घडली घटना
केरळच्या पाथनमथिट्टा जिल्ह्यातील ही घटना आहे. दावा करणारी युवती ही दोन महिन्यांपूर्वीच १८ वर्षांची झाली. शाळेच्या एका समुपदेशन सत्रात तिने हा दावा केला. पहिल्यांदाच या मुलीला बोलताना पाहिल्यानंतर अनेकांचे धाबेच दणाणले. या युवतीने गेल्या चार वर्षात आपल्यावर ६४ वेळा अत्याचार झाल्याचे सांगितले.
कशी फुटली वाचा
पठाणमथिट्टा बाल कल्याण समितीचे अध्यक्ष राजीव एन यांनी या प्रकाराची पोलिसांना माहिती दिली. त्यांच्या मते, किशोरवयीन मुलीने पहिल्यांदा शाळेतील समुपदेशन सत्रात तिच्यावर झालेल्या लैंगिक शोषणाबद्दल बोलले. समुपदेशकांनी संपर्क साधलेल्या बालकल्याण समितीच्या मध्यस्थीनंतर पोलिस गुन्हा दाखल करण्यात आला. क्रीडापटू असलेल्या मुलीवर क्रीडा शिबिरांसह पठाणमथिट्टा येथे विविध ठिकाणी अत्याचार झाले. आरोपींमध्ये बहुसंख्य प्रशिक्षक, वर्गमित्र आणि स्थानिक रहिवासी आहेत.
दाखल झाला गुन्हा
पोक्सो कायद्यान्वये जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात या प्रकाराबाबत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पठाणमथिट्टा जिल्हा पोलिस प्रमुख स्वतः या प्रकरणाचा तपास करत आहेत. या मुलीकडे मोबाईल नाही. मात्र ज्या-ज्या व्यक्तीने तिच्यावर अत्याचार केला त्या सुमारे ४० जणांचे मोबाईल नंबर तिने आपल्या वडिलांच्या मोबाईलमध्ये सेव्ह करुन ठेवला असल्याचे तिचे म्हणणे आहे. पोलिसांनी तीने सांगितलेल्या पाच संशयितांना अटक केली. सहावा संशयित अगोदपासूनच तुरुंगात आहे.
मानसोपचारांची मदत
युवतीच्या या दाव्यामुळे संपूर्ण भारतात खळबळ उडाली. बाल कल्याण समितीच्या सदस्यांनाही धक्का बसला. या मुलीने केलेले आरोप खरे आहेत का, याची खात्री करण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांच्या मदतीने युवतीची तपासणीही करण्यात येत आहे. बाल कल्याण समितीच्या अध्यक्षांच्या मते, हे प्रकरण दिसते तेवढे साधे नाही. एसपींनी स्वतः तपास सुरु केला असून यात अजूनही मोठी नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.












Click it and Unblock the Notifications