दिल्लीचा मुख्यमंत्री ठरला..? उद्या भाजप आमदारांची बैठक; १९ फेब्रुवारीला शपथविधी
दिल्लीचा पुढचा मुख्यमंत्री कोण, या प्रश्नाचे उत्तर उद्या मिळू शकते. नवीन मुख्यमंत्री निवडण्यासाठी उद्या दुपारी भाजतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ पक्षाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत सभागृह नेत्याचे नाव निश्चित केले जाईल. त्याच बैठकीत पुढचा मुख्यमंत्री कोण, हे नावही निश्चित करण्यात येणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुढच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी हा १९ किंवा २० फेब्रुवारीला होई शकतो.

बैठकांचा सपाटा
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नूतन आमदारांची बैठक घेतल्याचे समजते. त्याआधी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी सर्व भाजप सरचिटणीसांसोबत बैठक घेतली होती. या बैठकीत नवीन मुख्यमंत्र्याच्या चेहऱ्याबद्दल चर्चा केल्याचे समजते. या बैठकीत सर्व समीकरणे लक्षात घेऊन दिल्लीची कमान कोणाला द्यावी, विकासाबाबत दिल्लीतील चांगला चेहरा कोण, पक्षाची कमान दीर्घकाळ कोण सांभाळू शकते, अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. हे सगळे पाहता दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी मोठा चेहरा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भाजप धक्का देणार
भाजपने यापूर्वी अनेकदा धक्कातंत्राचा वापर केला आहे. त्यामुळे पक्षाचे नेतेही मुख्यमंत्री म्हणून कोणाचेही नाव घेण्यास कचरत असल्याचे सांगितले जाते. कनिष्ठ पातळीवरील कार्यकर्त्यांपैकी एकाला मुख्यमंत्री केले जाईल, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे. उद्याच्या बैठकीत ४८ आमदारांपैकी १५ आमदारांची नावे निश्चित केली जाणार आहेत. याच नावांमधून एक मुख्यमंत्री, मंत्री व सभापतींचे नाव निश्चित केले जाणार असल्याचे सांगितले जाते.
कुणाची नावे चर्चेत
या वर्षी होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजप पूर्वांचल समीकरण, पंजाबला लक्षात घेऊन पंजाबी-शीख सरदार समीकरण, पश्चिम उत्तर प्रदेश-हरियाणा-राजस्थानला लक्षात घेऊन जाट समीकरण, यासारख्या समीकरणांमध्ये संतुलन साधण्याचा प्रयत्न करेल असे मानले जात आहे. रेखा गुप्ता, प्रवेश वर्मा, मोहन सिंग बिष्ट, विजेंद्र गुप्ता, सतीश उपाध्याय, आसिष सूद, शिखा राय आणि पवन शर्मा ही नावे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत घेतली जात आहे.












Click it and Unblock the Notifications