केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी; महागाई भत्ता 2 टक्के वाढला, कुणाला किती पगार मिळणार? समजून घ्या गणित

सध्या देशभरातली सरकारी कर्माचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगाची प्रतिक्षा लागलेली आहे. मात्र त्यापूर्वीच सातव्या वेतन आयोगाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. मोदी सरकारने शुक्रवारची केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) 2 टक्के वाढ करण्याची घोषणा केली. या निर्णयाचा केंद्रीय कर्मचारी व पेंशनर्सचा अशा दोघांनाही लाभ होईल. या दुरुस्तीमुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53 टक्क्यांवरुन थेट 55 टक्के होईल. ही वाढ सातव्या वेतन आयोगाद्वारे देण्यात आली आहे. त्यामुळे आठव्या वेतन आयोगापूर्वीच केंद्रीय कर्मचाऱ्यांचे पगार वाढणार आहेत.

Seventh Pay Commission DA increased

डीए म्हणजे काय

डीए म्हणजे महागाई भत्ता. सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाशी जोडलेला हा भत्ता वर्षातून दोनदा वाढवला जातो. कर्मचारी व पेन्शनधारकांना महागाईची झळ कमी बसावी, यासाठी त्यात वर्षातून दोनदा वाढ करण्यात येते.

किती फायदा होईल?

सरकारने सातव्या वेतन आयोगाद्वारे दोन टक्के महागाई भत्ता वाढवला आहे. जर मुळ वेतन १८ हजार असेल तर दोन टक्के म्हणजे दरमहा ३६० रुपये म्हणजेच वर्षाला ४३२० रुपये वाढ मिळले. जर पेन्शन ९ हजार असेल तर दरमहा १८० रुपये म्हणजेच वर्षाला २१६० रुपये जास्त मिळतील.

दोन महिन्यांचा फरकही मिळणार

सरकारने मार्च महिन्यांत ही वाढ जाहीर केली. परंतु केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी व फेब्रुवारी या दोन महिन्यांचा भत्ता देखील थकबाकी म्हणून दिला जाईल. नवीन वेतनवाढीनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचे पगार वाढणार आहेत. जानेवारी व फेब्रुवारी महिन्याची ७६० रुपये थकबाकी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळेल, असे सांगितले जात आहे.

पेन्शनधारकांनाही फायदा

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर केंद्र सरकारने निवृत्त कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यातही दोन टक्के वाढ केली आहे. त्यामुळे पेन्शनधारकांची पेन्शनही वाढणार आहे. सरकारच्या डीए आणि डीआरच्या निर्णयाचा फायदा एक कोटींहून अधिक केंद्रीय कर्मचाऱ्यांना होणार आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+