पाच वर्षांनी भारतात पुन्हा दाखल झाले 36 चिनी अ‍ॅप्स, 2020 मध्ये घालण्यात आली बंदी, टिकटॉकही परतणार ?

केंद्र सरकारने 2020 मध्ये टिकटॉकसह 200 हून अधिक अ‍ॅप्सवर बंदी घातली होती.मात्र आता यापैकी 36 अ‍ॅप्स परत आले आहेत. यामध्ये लोकप्रिय शेअरिंग अ‍ॅप्स झेंडरचाही समावेश आहे. हे अ‍ॅप्स गुगल प्ले स्टोअर आणि अ‍ॅपल स्टोअरवरून डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहेत.

काही कंपन्यानी अ‍ॅप्समध्ये किरकोळ बदल करत परत आले आहेत, जसे की त्यांचे ब्रँड नाव किंवा मालक बदलले आहेत. काही इतर अ‍ॅप्सनी भारतीय कंपन्यांशी करार केला आहे. जेणेकरून ते कायदेशीररित्या भारतात काम करू शकतील. दरम्यान 2020 मध्ये बंदी घातलेले लोकप्रिय शॉर्ट व्हिडिओ अ‍ॅप्स टिकटॉकचा यात समावेश नाही.

chinese apps

भारतीय बाजारपेठेत पुन्हा प्रवेश केलेल्या काही प्रमुख अ‍ॅप्सची यादी

Xender - एकेकाळी लोकप्रिय फाइल-शेअरिंग अ‍ॅप्स फाइल शेअर, शेअर म्युझिक म्हणून असलेलं अॅप पुनरागमन झालं आहे. परंतू ते अजून गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध नाही.

MangoTV - या चिनी स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मने त्याच्या ब्रँडिंग किंवा ओळखीत कोणताही बदल न करता थेट पुनरागमन केले आहे.

Youku - एक प्रमुख चिनी व्हिडिओ स्ट्रीमिंग सेवा, जी अनेकदा यूट्यूबशी तुलना केली जाते, या अ‍ॅप्सचं देखील पुनरागमन झालं आहे.

Taobao - अलिबाबाचे शॉपिंग अ‍ॅप्स कोणत्याही रीब्रँडिंगशिवाय पुनरागमन करत आहे.

Tantan - या डेटिंग अ‍ॅप्सने स्वतःला टॅनटन - एशियन डेटिंग अ‍ॅप्स म्हणून पुनर्ब्रँड केले आहे.

या अ‍ॅप्सचं भारतात पुनरागमन झालं आहे. कारण या अ‍ॅप्सनी त्यांचे सर्व कामकाज भारतात शिफ्ट केलं आहे. तसेच, भारतीयांचा डेटा भारतीय सर्व्हरवर साठवला जात आहे. अनेक चिनी अ‍ॅप्स पूर्णपणे फ्रँचायझी मॉडेलवर चालत आहेत, ज्यांचे सर्व कामकाज भारतीय कंपन्या पाहत आहेत, असे अ‍ॅप्स फक्त त्यांचे नाव बदलून रॉयल्टी आकारत आहेत. जसे SHEIN अ‍ॅप्स भारतात परतले आहेत. हे एक ई-कॉमर्स ऑनलाइन फॅशन अ‍ॅप आहे. रिलायन्सने ते भारतात पुन्हा लाँच केले आहे. रिलायन्स या अ‍ॅपच्या ऑपरेशन आणि डेटा स्टोरेजची काळजी घेत आहे. भारतात परतणाऱ्या 36 अ‍ॅप्सपैकी देशात टिकटॉकचे पुनरागमन होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+