महाकुंभ 2025..! चेंगराचेंगरीनंतर सुमारे ३५ भाविक बेपत्ता, कुटुंबाची प्रयागराजमध्ये शोधाशोध सुरु

प्रयागराजमध्ये सध्या महाकुंभमेळा सुरु आहे. मंगळवारी रात्री उशिरा महाकुंभात चेंगराचेंगरीची घटना घडली. मात्र आजही अनेक कुटुंबातील लोकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. गोरखपूर बस्ती मंडळातील अनेक डझन लोक मंगळवारी मौनी अमावस्येला स्नान करण्यासाठी गेले होते. चेंगराचेंगरीनंतर काही लोक परतले, मात्र 35 लोक आहेत ज्यांचे कुटुंबीय अजूनही त्यांचा शोध घेत आहेत. बेपत्ता झालेले लोक जिवंत आहेत की नाही, ही शंका या बेपत्ता झालेल्यांच्या कुटुंबाच्या मनात अजूनही आहे.

Maha Kumbh 2025

कुटुंबाची शोधाशोध सुरु

गोरखपूरच्या सहजनवा येथील विंध्या यादव यांची पत्नी राजकुमार यादव या त्यांच्या गावातील १० लोकांसह २७ जानेवारीला प्रयागराजला गेल्या होत्या. मंगळवारी रात्री महाकुंभच्या गेट क्रमांक 20 येथून त्या बेपत्ता झाल्या. बरहलगंजच्या 53 वर्षीय सावित्री आणि टाडा गावातील तारकेश्वर तिवारीही बेपत्ता आहेत. सहजनवाच्या विमलादेवी, एम्सच्या बिंदा देवीही बेपत्ता आहेत. सुमारे ३५ बेपत्ता लोकांची शोधाशोध त्यांच्या नातेवाईकांकडून सुरु असल्याचे सांगितले जात आहे.

बेपत्ता लोकांची यादी

गोरखपूर येथील विमला देवी, नेवास खास, सहजनवा, बडहलगंज येथील तारकेश्वर तिवारी, सावित्री, सहजनवा येथील विंध्या यादव, एम्स येथील बिंदा देवी, केसरी देवी, सरस्वती देवी, खोराबार येथील सोनमती देवी, गोला बाजार येथील प्रभावती देवी, बेलीपार येथील चांदमती, अशरफी देवी, कैपियरगंज येथील निर्मला, खोराबार येथील गोरख चौधरी, संत कबीर नगर येथील कृष्णा कुमारी, कलावती, कुशीनगर येथील सुदामी देवी, बस्ती येथील शीलादेवी, राजमती, पुद्दन सोनकर, दुबौलिया, रामजी, राधिका, विमला, नाकादेई रुधौली, शांती, महराजगंज येथील गायत्री, सिद्धार्थनगर येथील इंद्रावती, देवरिया येथील शांती, मीरा, मायाराणी, पूनम, कुमारी देवी, सुभावती, सोनमटीया, राकेश.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+