Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

प्रेम, विवाह अन् पत्नीकडून पतीची हत्या..! दाक्षिणात्य 'सस्पेंन्स थ्रिलर'ची पटकथा शोभावी अशा 3 घटना

मुस्कान रस्तोगी. यूपीतील मेरठची. मुस्कान हे नाव जेवढं गोड आहे त्यापेक्षा कित्येक पटीने ती हिंस्त्रही आहे. हिंस्त्र यासाठी की, मुस्कानने तिच्या स्वतःच्या पतीचे तुकडे-तुकडे केले. विशेष म्हणजे ज्याचे तुकडे केले त्याच्यासोबतच तिने नऊ वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. त्यानंतर याच महिन्यात दुसरी घटना समोर आली. घटना होती युपीतीलच औरैयोची. लग्नाच्या १५ व्या दिवशी पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा सुपारी देऊन खून केला. लग्नात 'मूह दिखाई'चे जे पैसे मिळाले होते, तेच पैसे नवऱ्याच्या हत्येची सुपारी द्यायला पत्नीने वापरले. पोलिसांनी पत्नी प्रगती यादव, तिचा प्रियकर अनुराग यादव व सुपारी घेणाऱ्या रामजी नागरला ताब्यात घेतले. याच महिन्यातील तिसरी घटना होती, कर्नाटकातील बेंगळुरुची. तेथील ३७ वर्षिय व्यावसायिकाचा पत्नी व सासूने खून केला. पोलिसांनी पत्नी यशस्वीनी व सासू हेमाबाई यांनी अटक केलीय. एकाच महिन्यात घडलेल्या या तिन्ही घटनांत पत्नीने आपल्या पतीला क्रुरपणे संपवले. विशेष म्हणजे ही तिन्हीही लव्ह मॅरेज होती. बसला ना धक्का...

Crime Story

समाज कुठे चाललाय? हा प्रश्न यानिमित्ताने समोर आला. ज्याच्यावर प्रेम केलं, घरच्यांचा विरोध पत्करून त्याच्याशीच लग्न केलं, आणि आता त्यालाच क्रूरपणे संपवलंय. रिती, परंपरा आणि आजूबाजूची व्यवस्था नेमकी कुठे चाललीय? याची उत्तरे आता शोधावी लागणार आहेत. या तिन्ही प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या तिन्ही घटना नेमका काय आहेत ते आपण सविस्तर पाहू...

Crime Story

१. सौरभ तिवारी- मुस्कान रस्तोगी

उत्तर प्रदेशमधील मेरठमध्ये एक धक्कादायक घटना घडली. मुस्कान रस्तोगी नामक महिलेने तिचा प्रियकर साहिल शुक्लाला बरोबर घेऊन पती सौरभ राजपूतची हत्या केली. हत्या केल्यानंतर मृतदेहाचे १५ तुकडे केले. ते एका ड्रममध्ये भरून वरून काँक्रिट ओतले. हत्येनंतर मुस्कान तिच्या प्रियकर साहिल शुक्लाला घेऊन हिमाचल प्रदेशला दुसरा हानिमून करुन आली. मुस्कान ही २७ वर्षांची आहे. २०१६ साली तिने सौरभ राजपूतशी लग्न केले. या लग्नाला दोन्ही कुटुंबाचा विरोध होता. परंतु सौरभने मुस्कानसाठी त्याच्या कुटुंबियांना सोडले. दोघेही मेरठमध्ये भाड्याच्या घरात राहत होते. मुस्कानने २०१९ साली एका मुलीला जन्म दिला. त्याच काळात मुस्कानला तिचा बालपणीचा मित्र साहिल शुक्ला भेटला. मुस्कान आणि साहिल इयत्ता आठवीपर्यंत एकाच वर्गात होते. तेव्हा सुरु झालेल्या गुटरगूला आता पुन्हा नवे धुमारे फुटले आणि त्यातूनच सौरभ रजपूतच्या हत्येचा प्लॅन आखला गेला. सौरभ राजपूतच्या हत्येनंतर अनेक भयानक खुलासे समोर आले. शवविच्छेदन अहवालात धक्कादायक गोष्टी समोर आल्या. हत्या करताना मुस्कान रस्तोगी तिच्या बेशुद्ध पती सौरभ राजपूतच्या छातीवर बसली. प्रियकर साहिल शुक्लाने तिला चाकू दिला. मुस्कानने सौरभच्या छातीत तीन वार केले. सौरभ मेल्याची खात्री पटल्यानंतर सौरभच्या शरीराचे तुकडे करण्यात आले. पतीच्या बाॅडीवर काँक्रीट ओतून मुस्कान व साहिल हिमाचलला फिरायला गेले. आता हे दोघेही जेलची हवा खात आहेत.

Crime Story

२. दिलीप- प्रगती यादव

उत्तर प्रदेशातील औरैया येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली. लग्नाच्या १५ व्या दिवशी पत्नीने प्रियकराच्या मदतीने आपल्या पतीची सुपारी देऊन हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्नीने लग्नात 'मूह दिखाई'ला मिळालेले पैसे आणि दागिने देऊन एका शूटरला पतीची सुपारी दिली. त्यासाठी प्रियकराने मध्यस्थी केली. शूटरने २४ मार्चला दिलीपला ठार मारले. पोलिसांनी आरोपी पत्नी प्रगती यादव, तिचा प्रियकर अनुराग यादव आणि कॉन्ट्रॅक्ट किलर रामजी नागर यांना अटक केली. ही घटनाही एकाद्या सस्पेन्स चित्रपटाचे कथानक शोभावे अशीच आहे. प्रगती यादवची मोठ्या बहिणीचे लग्न २०१९ ला मृत दिलीपच्या मोठ्या भावाशी झाले होते. दिलीप हा एक प्रतिष्ठीत व्यावसायिक होता. बहिण ज्या घरात दिली त्याच घरात प्रगतीला द्यायचे असे कुटुंबियांनी ठरवले होते. प्रगतीचीही दिलीपशी पहिल्यापासून ओळख होती. आपलं लग्न दिलीपशीच होणार आहे, हेही प्रगतीला माहित होतं. पण तिचा अजून एकासोबत म्हणजेच अनुराग यादवसोबत लफडं सुरु होतं. आपलं लग्न होणारच आहे, हे ओळखून प्रगतीने दिलीपची संपत्ती हडप करण्याचा प्लॅन आखला. तो प्रियकर अनुरागला सांगितला. प्लॅननुसार लग्न झाल्यावर दिलीपची सगळी संपत्ती प्रगतीला मिळणार होती. त्यानुसार लग्न झाल्यावर प्रगती पहिल्यांदा माहेरी आली. लग्नात मिळालेले पैसे व दागिने तिने अनुरागला दिले. अनुरागने सुपारी किलर रामजी नागरला ते दिले. त्यानुसार नागरने १९ मार्चला दिलीपच्या डोक्यात बोअरच्या बंदुकीची गोळी मारुन चाकूने त्याचा खून केला. प्रगतीची योजना अशी होती की, विधवा झाल्यानंतर ती तिच्या पतीची कोट्यवधींची मालमत्ता ताब्यात घेईल आणि तिच्या प्रियकरासोबत आनंदाने राहील. मात्र पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावलाच.

३. लोकनाथसिंग- यशस्विनी

दोन दिवसांपूर्वी कर्नाटकातही अशीच घटना समोर आली. बेंगळुरुजवळ एका ३७ वर्षीय रिअल इस्टेट व्यावसायिकाची मृतदेह कारमध्ये सापडला. पोलिस तपासात पत्नी आणि सासूने ही हत्या केल्याचे समोर आले. लोकनाथ सिंह असं हत्या करण्यात आलेल्या व्यावसायिकाचं नाव होतं. या घटनेनंतर पोलिसांनी लोकनाथ सिंह यांच पत्नी यशस्विनी आणि सासू हेमाबाई यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर २०२४ मध्ये लोकनाथ आणि यशस्विनी यांनी घरच्यांना न सांगता लग्न केलं. मात्र, ही गोष्ट यशस्विनीच्या कुटुंबापासून लपवून ठेवण्यात आली होती. तसेच लग्नानंतरही लोकनाथने आपल्या पत्नीला तिच्या पालकांच्या घरीच ठेवलं होतं. या दोघांच्या वयातील लक्षणीय अंतरामुळे कुटुंबाचा या लग्नाला विरोध होता, म्हणून या दोघांनी घरच्यांना न सांगता लग्न केलं होतं. मात्र, दोन आठवड्यांपूर्वी यशस्विनीच्या कुटुंबाला सत्य काय ते समजलं आणि नाट्यमय घडामोडी घडल्या. लोकनाथच्या विवाहबाह्य संबंधांचे आणि संशयास्पद व्यावसायिक व्यवहारांचे आरोप त्याच्यावर करण्यात आले. यामधून वादविवाद वाढले आणि घटस्फोटाच्या चर्चा सुरू झाल्या. पोलिसांच्या म्हणण्यांनुसार, लोकनाथने त्याच्या पत्नी आणि सासूला धमकावण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे त्यांनी त्याच्या हत्येचा कट रचला. प्राथमिक तपासात अशी माहिती समोर आली की, आरोपीने लोकनाथलाच्या जेवणातून औषध दिलं होतं. तसेच त्यानंतर यशस्विनीने त्याला चिक्काबनावरा येथील एका परिसरात नेलं. तेव्हा तिची आई पाठिमागून एका रिक्षातून आली. त्यानंतर एका निर्जनस्थळी नेहून लोकनाथचा गळा कारमध्येच आवळून हत्या करण्यात आली.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+