2026 Holiday Calendar:प्रवासाची सुवर्णसंधी! 15 लांब वीकेंड्स अन् 50 दिवसांच्या सुट्टीचे प्लॅनिंग!

2026 Holiday Calendar India : प्रवासप्रेमी आणि फिरण्याची आवड असलेल्या लोकांसाठी २०२६ हे वर्ष खास पर्वणी घेऊन येणार आहे. नवीन वर्षाचे स्वागतच एका लांब वीकेंडने (Long Weekend) होत असून, संपूर्ण वर्षात एकूण १५ मोठे वीकेंड्स मिळणार आहेत.

जर तुम्ही तुमच्या हक्काच्या सुट्ट्यांसोबत शनिवार-रविवारचे योग्य नियोजन केले, तर वर्षाकाठी तब्बल ५० दिवस पर्यटनाचा आनंद लुटू शकता. धार्मिक, सांस्कृतिक आणि निसर्गरम्य पर्यटन स्थळांची सफर घडवून आणणारे २०२६ चे हे सुट्टीचे कॅलेंडर खालीलप्रमाणे आहे.

2026 Holiday Calendar India

१. जानेवारी - फेब्रुवारी: आध्यात्मिक आणि सांस्कृतिक सुरुवात

वर्षाची सुरुवात प्रयागराज आणि ब्रजमधील उत्सवांनी होणार आहे.

प्रयागराज माघ मेळा (३ जानेवारी - १५ फेब्रुवारी): महाकुंभानंतरचा हा भव्य मेळा असेल. सुमारे १५ कोटी भाविकांची उपस्थिती अपेक्षित असून, यावेळी सुरक्षेसाठी ४०० AI कॅमेरे आणि ५०० ड्रोन तैनात केले जातील. गंगा स्नान आणि कल्पवासाचा अनुभव घेण्यासाठी हा उत्तम काळ आहे.

ब्रज होळी महोत्सव, मथुरा (२३ जानेवारी - ३ मार्च): येथे होळी केवळ एक दिवस नाही, तर ४० दिवस साजरी होते. लाठमार होळी आणि फूल होळीचा आनंद घेण्यासाठी लांब वीकेंडचे नियोजन नक्की करा.

२. मार्च - एप्रिल: वसंतोत्सव आणि निसर्गाची उधळण

हा काळ निसर्गप्रेमी आणि संगीत प्रेमींसाठी सर्वोत्तम आहे.

शिग्मो महोत्सव, गोवा (१५-२९ मार्च): गोव्याची पारंपरिक संस्कृती आणि लोककला पाहण्यासाठी शिग्मो ही उत्तम संधी आहे.

ट्यूलिप महोत्सव, श्रीनगर (२९ मार्च - ५ एप्रिल): आशियातील सर्वात मोठ्या ट्यूलिप गार्डनमध्ये लाखो फुलांचा गालिचा पाहायला मिळेल.

संकट मोचन संगीत महोत्सव, वाराणसी (२-७ एप्रिल): शास्त्रीय संगीताची आवड असल्यास वाराणसीतील ही मैफल चुकवू नका.

आओलोंग महोत्सव, नागालँड (१-६ एप्रिल): ईशान्य भारताची संस्कृती आणि तिथल्या जमातींच्या जीवनाचे दर्शन या महोत्सवातून घडते.

३. मे - जून: कडक उन्हाळा आणि पावसाळ्याची चाहूल

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी थंड हवेची ठिकाणे सज्ज असतील.

माउंट अबू उन्हाळी महोत्सव: राजस्थानमधील एकमेव हिल स्टेशनवर लोकनृत्य आणि बोट रेसिंगचा आनंद घेता येईल.

ऊटी उन्हाळी महोत्सव (मे अखेर): तामिळनाडूच्या निलगिरी पर्वतरांगांमध्ये फुलांचे प्रदर्शन आणि निसर्गसौंदर्य पर्यटकांना भुरळ पाडेल.

साओ जोआओ, गोवा (२४ जून): पावसाळ्याच्या सुरुवातीला विहिरीत उड्या मारून साजरा केला जाणारा हा उत्सव पर्यटकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे.

हेमिस मठ महोत्सव, लडाख (२४-२५ जून): लडाखच्या 'चाम' नृत्याचा अनुभव घेण्यासाठी हा काळ सर्वोत्तम आहे.

४. सप्टेंबर - ऑक्टोबर: सण आणि परंपरांचा मेळा

गणेशोत्सव, मुंबई (१४-२३ सप्टेंबर): मुंबईचा उत्साह, लालबागचा राजा आणि भव्य मिरवणुका पाहण्यासाठी हा काळ खास आहे.

बटुकम्मा महोत्सव, तेलंगणा (११-१८ ऑक्टोबर): महिलांचा आणि फुलांचा हा अनोखा उत्सव तेलंगणाची संस्कृती जवळून दाखवतो.

५. नोव्हेंबर - डिसेंबर: वर्षाचा दिमाखदार समारोप

वर्षाचा शेवट गुरु नानक जयंती आणि ख्रिसमसच्या सुट्ट्यांनी होईल.

नोव्हेंबरचा ब्रेक: गुरु नानक जयंतीच्या जोडून येणाऱ्या सुट्ट्यांमध्ये एखादी मोठी ट्रिप प्लॅन करता येईल.

३१ डिसेंबर सेलिब्रेशन: मुंबई, गोवा, दिल्ली आणि बंगळुरूमध्ये नववर्षाच्या स्वागतासाठी मेगा कॉन्सर्ट्स आणि डीजे नाईट्सचे आयोजन केले जाते.

२०२६ मध्ये सुट्ट्यांचे प्रमाण जास्त असल्याने विमान तिकीट आणि हॉटेल बुकिंग आगाऊ करणे फायद्याचे ठरेल. १५ लांब वीकेंड्सचा फायदा घेऊन तुम्ही भारताच्या कानाकोपऱ्यातील विविध संस्कृतींचा अनुभव घेऊ शकता.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+