Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

10 नक्षलवाद्यांना कंठस्नान; छत्तीसगडमध्ये पोलीस-नक्षलवाद्यांमध्ये चकमक, मोठा शस्त्रसाठा जप्त

Naxalite operation in Chhattisgarh- छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात पोलीस चकमकीत 10 नक्षलवादी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. कोंटा येथील भेज्जी भागात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये ही चकमक झाल्याची माहिती आहे. जवानांनी घटनास्थळावरून तीन स्वयंचलित शस्त्रांसह अनेक शस्त्रेही जप्त केली आहेत. पहाटेपासून संरक्षण दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू होती. डीआरजीची टीम नक्षलवाद्यांना घेरण्यासाठी बाहेर पडली होती.

Naxalite operation in Chhattisgarh

नक्षलवाद्यांचे 10 मृतदेह सापडले

सुकमा जिल्ह्याच्या कोंटा आणि किस्टाराम एरिया कमिटीच्या नक्षलवादी सदस्यांच्या गुप्त माहितीवरून डीआरजी आणि सीआरपीएफ दल रवाना झाले होते. सुकमा जिल्ह्यातील भेज्जी पोलीस स्टेशन हद्दीतील कोराजुगुडा, दंतेसपुरम, नागराम, भंडारपदर या गावांच्या जंगल-टेकड्यांमध्ये डीआरजी टीम आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. दोन्ही बाजूंनी गोळीबार करण्यात आला. त्यात अनेक नक्षलवादी ठार झाल्याची माहिती आहे. आत्तापर्यंतच्या शोधकार्यात 10 नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत.

कारवाईत सापडली अनेक शस्त्रे

मिळालेल्या माहितीनुसार मुळचे कोल्हापूर निवासी आणि सुकमाचे पोलीस अधीक्षक किरण चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांची टीम भेजीच छत्तीसगढच्या हद्दीत पोहोचली होती. या ठिकाणी पोलिसांचाी माओवाद्यांशी चकमक झाली. या चकमकीत पोलिसांनी दहा माओवाद्यांना कंठस्नान घातलं आहे. यामधील तीन माओवाद्यांचे मृतदेह पोलिसांनी घेतले आहे. तसेच या चकमकीनंतर माओवाद्यांच्या मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. नक्षलवाद्यांकडून INSAS, AK-47, SLR आणि इतर अनेक शस्त्रे जप्त करण्यात आले आहेत. अजूनही सर्च ऑपरेशन सुरु आहे.
--

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+