Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

ऑफिसमध्ये खुर्चीवरून पडून लखनऊच्या महिला अधिकाऱ्याचा मृत्यू, सहकारी म्हणाले- ती कामाच्या तणावात होती

Work stress Lucknow woman officer dies : कामाच्या दबावामुळे पुण्यातील एका कंपनीत काम करणाऱ्या ॲना सेबिस्टीयन पेरियार या तरुणीच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच आता आणखी एका महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. लखनौतील एका महिलेचा कार्यालयात खुर्चीवरून पडून मृत्यू झाला असून तिचा मृत्यू कामाच्या ताणामुळे झाल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे.

मृत महिलेवर कामाचा दबाव होता, या महिलेच्या सहकाऱ्यांनी सांगितले आहे. यासंदर्भात दैनिक भास्करने वृत्त दिले आहे. ही घटना मंगळवारी घडली असून सदाफ फातिमा असे महिलेचे नाव असून ती एचडीएफसी बँकेत काम करते. ती एचडीएफसी बँकेच्या गोमतीनगर येथील विबुती खंड शाखेत अतिरिक्त उप-उपाध्यक्ष म्हणून महिलेची नियुक्त झाली होती, असेही या माध्यमाने म्हटले आहे.

Work stress Lucknow woman officer dies

नेमका काय घडला प्रकार

24 सप्टेंबर रोजी सदफ ही आपल्या कार्यालयात काम करत असताना खुर्चीवरून पडली. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु तिला डाॅक्टरांनी मृत घोषित केले. त्यानंतर तिचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला, असे त्यात म्हटले आहे. ही घटना कामाच्या तणावामुळे घडल्याचे बोलले जात आहे. पुण्यातील घटनेनंतर
आता लखनऊच्या घटनेची चर्चा होत आहे.

अखिलेश यादव यांची एक्सवर पोस्ट

आपल्या एक्स पोस्टमध्ये, समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी ही घटना "चिंताजनक" असल्याचे सांगितले आणि ते "देशातील सध्याच्या आर्थिक दबावाचे प्रतीक" असल्याचे म्हटले आहे म्हणजेच त्यांनी केंद्रावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.

पोस्टमध्ये काय...?

"सर्व कंपन्या आणि सरकारी विभागांना याबाबत गांभीर्याने विचार करावा लागेल. ही देशाच्या मानव संसाधनाची कधीही भरून न येणारी हानी आहे. अशा आकस्मिक मृत्यूंमुळे कामकाजाच्या परिस्थितीवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. कोणत्याही देशाच्या प्रगतीचे खरे मोजमाप हे वाढीव प्रमाणात होत नाही. सेवा किंवा उत्पादनांचे आकडे पण एक व्यक्ती मानसिकदृष्ट्या किती मुक्त, निरोगी आणि आनंदी आहे," असे अखिलेश यादव यांच्या पोस्टमध्ये मजकूर आहे.

भाजपच्या आर्थिक धोरणावर टीका

समाजवादी पक्षाच्या प्रमुखांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली आणि देशाची आर्थिक धोरणे अपयशी ठरल्याचा आरोप केला."भाजप सरकारच्या अयशस्वी आर्थिक धोरणांमुळे कंपन्यांचा व्यवसाय इतका कमी झाला आहे की त्यांचा व्यवसाय वाचवण्यासाठी त्या कमी लोकांना जास्तीची कामं करायला लावली जात आहेत. अशा आकस्मिक मृत्यूला भाजप सरकार जेवढे जबाबदार आहे तितकेच ते विधानेही जनतेचे मानसिक खच्चीकरण करणारे आहे. हे सांगितले.

पुण्यातील ती घटना काय होती...?

जुलैमध्ये, 26 वर्षीय ॲना सेबॅस्टियन पेरायल ही चार्टर्ड अकाउंटंट, पुण्यातील अर्न्स्ट अँड यंग (EY) या फर्ममध्ये काम करत होती. तिला रुजू होऊन केवळ चार महिनेच झाले होते पण कामाच्या तणावामुळे तिचा मृत्यू झाल्याचे पुढे येत आहे. तिच्या मृत्यूनंतर, सेबॅस्टियनच्या आईचे नुकतेच ॲना काम करत असलेल्या कंपनीला पत्र लिहून आरोप केला की कामाचा ताण आणि कामाच्या वाढलेल्या तासांमुळे तिच्या मुलीवर परिणाम झाला होता. कंपनीने मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. आता या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+