Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मोठी बातमी: तिरुपती लाडूप्रकरणावर आरोग्य मंत्रालयाने 'आंध्र' सरकारला सविस्तर अहवाल मागवला!

Tirupati Ladu case : तिरुपती लाडूमध्ये प्राण्यांची चरबी आणि माशांचे तेल असल्याचा एका खासगी संस्थेचा धक्कादायक अहवाल आल्यानंतर आता या प्रकरणाची आरोग्य मंत्रालयाने दखल घेतली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांच्याकडे तिरुपती लाडू बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तुपात प्राण्यांची चरबी असल्याच्या आरोपांवर सविस्तर अहवाल" मागितला आहे.

महत्वाची बाब म्हणजे तिरुपती येथील प्रसादाचे लाडूबद्दल देशातील कोट्यवधी भाविकांत आस्था असून ते मोठ्या भक्तिभावाने खातात. तर दुसरीकडे येथील लाडूमध्ये प्राण्यांची चरबी आणि माशांचे तेल आढळून आल्यानंतर आता खळबळ निर्माण झाली आहे.या पार्श्वभुमीवर अन्न प्रशासन मंत्री प्रल्हाद जोशी यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

Tirupati Ladu case

चंद्रबाबू नायडू काय म्हणाले?

तिरुपती लाडू प्रकरणावर "मुख्यमंत्री जे काही म्हणाले, ती गंभीर चिंतेची बाब आहे. सखोल चौकशीची गरज आहे आणि दोषीला शिक्षा व्हायला हवी." असे मुख्यमंत्री तथा तेलगू देसम पक्षाचे नेते चंद्रबाबू नायडू यांनी म्हटले आहे. या आठवड्यात गुजरातमधील सरकारी प्रयोगशाळेतील जुलैच्या अहवालाचा हवाला त्यांनी दिला आहे. विशेष म्हणजे सध्याचे विरोधक आणि वायएसआर काँग्रेस पक्षाचे प्रमुख वायएस जगन मोहन रेड्डी हे ज्यावेळी सत्तेत होते, तेव्हा लाडूत वापरले गेलेल्या तुपात गोमांस, माशांची चरबी होती असे त्यांनी म्हटले आहे.

वायएसआरचे प्रत्युत्तर

दरम्यान, वायएसआर काँग्रेसने या आरोपांवर जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.राज्यसभेचे खासदार वायव्ही सुब्बा रेड्डी म्हणाले की "देवतेला दररोज अर्पण केल्या जाणाऱ्या अन्नामध्ये आणि भक्तांना दिल्या जाणाऱ्या लाडूंमध्ये प्राण्यांच्या चरबीचा वापर केला जात असे म्हणणे देखील अकल्पनीय आहे". श्री रेड्डी यांनी मुख्यमंत्री नायडू यांच्या वक्तव्यावर टीका केली.

काय आहे प्रकरण

जगप्रसिद्ध तिरुपती लाडूमध्ये प्राण्यांच्या मांसातील चरबी असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. एका खाजगी प्रयोगशाळेने या दाव्यांतून स्पष्टता दिली आहे. आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिरात प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी आणि माशांचे तेल सापडल्याची खात्री प्रयोगशाळेच्या अहवालात झाली आहे. तिरुपती लाडूमध्ये गोमांस, डुकराची चरबी वापरली जाते, प्रयोगशाळेच्या अहवालानुसार, एनडीडीबी सीएएलएफ या खासगी प्रयोगशाळेने तयार केलेल्या तपासणी अहवालात असे समोर आले आहे की, तिरुपती लाडू बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तुपाच्या नमुन्यात पाम तेल, फिश ऑइल, बीफ फॅट आणि चरबीचा समावेश आहे (डुक्कर चरबी) आढळले.

ही प्रयोगशाळा पशुखाद्य, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या चाचणीवर लक्ष केंद्रित करते. सीएम चंद्रबाबू नायडू यांनी मागील वायएसआर काँग्रेस सरकारवर तिरुपती लाडू बनवण्यासाठी प्राण्यांची चरबी आणि निकृष्ट घटक वापरल्याचा आरोप केला होता.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+