अभिनेत्री शेफाली जरीवालाचा कार्डियक अरेस्टने मृत्यू! या हृदयविकारापुर्वी शरीर काय देते संकेत? वाचा
Shefali jariwala death : 'बिग बाॅस', 'नच बलिये'ची स्पर्धक आणि 'काटा लगा' फेम शेफाली जरीवाला हिचे मुंबईत निधन झाले. तिच्या मृत्यूची आज पहाटे अधिकृत घोषणा झाली. तिचा रात्री उशीरा कार्डियक अरेस्टमुळे मृत्यू झाला. धक्कादायक गोष्ट म्हणजे अवघ्या ४२ व्या वर्षी तिचे निधन झाले. तिला रुग्णालयात नेले असता ती मृत झाल्याचे स्पष्ट करण्यात आले.
शेफाली जारीवालाच्या संदर्भात दुर्दैवी गोष्ट ही की, तिला कार्डियक अरेस्टने थोडाही वेळ दिला नाही. मीडिया रिपोर्टनुसार, रुग्णालयात नेण्यापुर्वीच तिची हृदयगती थांबली अन् तिचा मृत्यू झाला. हृदयविकार बहुतांश प्रकरणात वेळ देत नाही, हे सर्वश्रृत असून शेफाली जारीवालावर ओढवलेल्या प्रसंगामुळे पुन्हा स्पष्ट झाले आहे.

तज्ज्ञ डाॅक्टर सांगतात, त्यानुसार, हृदयविकार कधीच अचानक येत नाही. तो नेहमीच आपल्याला आधी संकेत देत असतो. शरीरात त्याची लक्षणेही दिसतात पण आपण जर ती दुर्लक्षित केली आणि वेळीच उपाय केले नाहीतर कार्डियक अरेस्ट आणि हृदयविकाराचा झटका कधी येईल याची शाश्वती नाही. त्यामुळे कार्डियक अरेस्टपुर्वी शरीर काही संकेत देते, जर तुम्ही हे संकेत अन् लक्षणे जर ओळखली तर वेळीच प्राणहाणी टळू शकते. आपण आज याची लक्षणे जाणून घेऊया.
कार्डियाक अरेस्ट म्हणजे काय?
कार्डियाक अरेस्ट म्हणजे कार्डियाक अरेस्ट म्हणजे हृदय अचानक काम करणे बंद होणे. हे हृदयविकारापेक्षा वेगळे आहे. हृदयविकाराच्या झटक्यात, रक्तपुरवठा थांबतो तर कार्डियाक अरेस्टमध्ये, हृदयाचे ठोके थांबतात. या स्थितीत मेंदू, फुफ्फुसे आणि इतर अवयवांपर्यंत ऑक्सिजन पोहोचत नाही आणि जर त्वरित उपचार मिळाले नाहीत तर मृत्यू निश्चित आहे.
छातीत दुखणे
तज्ज्ञ डाॅक्टरांच्या मते, हृदयविकाराचे सर्वात खास लक्षण म्हणजे छातीच्या मध्यभागी किंवा डाव्या बाजूला वेदना किंवा दाब जाणवणे. ही वेदना जडपणा, जळजळ किंवा जडपणासारखी असू शकते, जी काही मिनिटे टिकते किंवा पुन्हा पुन्हा येते.
खांदा दुखणे
छातीत दुखण्याबरोबरच हे दुखणे शरीराच्या इतर भागांमध्येही पसरू शकते, जसे की खांदे, पाठ, मान, जबडा, दात किंवा काहीवेळा पोटाच्या वरच्या भागातही वेदना जाणवू शकतात. ही वेदना हळूहळू किंवा अचानक होऊ शकते.
थकवा आणि चक्कर येणे
हृदयविकाराच्या झटक्यादरम्यान एखाद्या व्यक्तीला अधिक थकवा जाणवू शकतो. याशिवाय अचानक चक्कर येणे किंवा बेशुद्ध वाटणे हे देखील त्याचे लक्षण आहे.
घाम येणे आणि श्वास लागणे
जर एखाद्या व्यक्तीला विनाकारण घाम येत असेल आणि श्वास घेण्यास त्रास होत असेल तर ते हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षण असू शकते. ही लक्षणे विशेषतः अशा लोकांमध्ये आढळतात ज्यांना आधीच हृदयाची समस्या आहे.
हृदयविकाराच्या झटक्याचे कारण काय?
हृदयविकाराच्या झटक्यामागे अनेक विशेष कारणे आहेत. सर्वात सामान्य कारण म्हणजे वय. विशेषत: 45 वर्षांवरील पुरुष आणि 55 वर्षांवरील महिलांना हृदयविकाराचा धोका जास्त असतो. इतर कारणांमध्ये धूम्रपान, मद्यपान, मधुमेह, चुकीचा आहार, कोलेस्ट्रॉल, लठ्ठपणा, तणाव, अनुवांशिक घटक आणि व्यायामाचा अभाव यांचा समावेश होतो. या सर्व कारणांमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत त्याची लक्षणे ओळखणे गरजेचे आहे.












Click it and Unblock the Notifications