Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

पुण्यात आणखी 3 गर्भवतींना झिका व्हायरसची लागण ! चाचणी पॉझिटिव्ह , बाधितांची संख्या 9 वर

पुणे: पुण्यात झिका व्हायरसचा संसर्ग हळूहळू जोर धरु लागला असून आणखी 3 गर्भवती महिलांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे झिका व्हायरसबाधित रुग्णांची संख्या 9 वर पोहोचली आहे

Zika Virus

प्राप्त माहितीनुसार, पुण्यात झिका विषाणूच्या संसर्गाची तीन नवीन प्रकरणे आढळली आहेत. लागण झालेल्यांत सर्व गर्भवती महिलांचा समावेश आहे. याआधी एकूण सहा रुग्णाला झिका विषाणूचा संसर्ग झाला होता. त्यात या तीन गर्भवतींची संख्या पाहता शहरात रुग्णाची संख्या नऊवर पोहचली आहे, अशी माहिती राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था एनआयव्हीच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली.

पुणे येथील सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. राजेश दिघे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले की, "झिका विषाणूचा संसर्ग झालेल्यात तीन गर्भवती महिलांचा समावेश आहे. एक रुग्ण पाषाण येथील, दुसरी मुंढवा येथील तर तिसरी रुग्ण आंबेगाव बुद्रुक येथील आहे. हा संसर्ग आता पुणे शहराच्या पलीकडे ग्रामीण भागातही पसरला आहे, असेही ते म्हणाले.

झिका संसर्ग बाधित भागात महानगर पालिका लक्ष ठेवीन आवश्यक त्या उपाययोजना करीत आहेत.यासंदर्भात महानगर पालिकेचा आरोग्य विभाग सोमवारी एक बैठक घेणार आहे. ग्रामीण पुण्यात एक प्रकरण आढळून आले असून संसर्गाच्या धर्तीवर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत.

बाधित भागात असहकार्य

दरम्यान, महानगर पालिकेच्या नमुना संकलनात आव्हाने येत आहेत.यामध्ये मुख्य आव्हान म्हणजे बाधित भागातील रहिवाशी सहकार्य करीत नसल्याचे दिसून आले. झिका विषाणू संसर्गाबाबत जनजागृतीचे कार्यक्रम राबवूनही, नागरी संस्थांना नमुने देण्यास लोक टाळत आहेत. काही घटनांमध्ये, झोपडपट्टी भागातील मुलांनी आरोग्य पथकावर दगडफेकही केल्याची बाब समोर आली. शहरी भागात, रहिवासी चाचणी आणि नमुने घेण्यासाठी पुढे येण्यास कचरत आहेत असे महानगर पालिकेच्या वतीनं सांगण्यात आले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+