Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

पुणेकरांनो काळजी घ्या : झिका रुग्णाची संख्या 15 वर पोहोचली

पुणे: पुण्यात झिका व्हायरसचा संसर्ग हळूहळू जोर धरु लागला असून आणखी 3 गर्भवती महिलांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे झिका व्हायरसबाधित रुग्णांची संख्या 15 वर पोहोचली आहे. पुण्यात झिका व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे.

Zika Virus

झिकाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुणेकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. तसेच आरोग्य यंत्रणा देखील सतर्क झाली आहे.

दोन दिवसांपूर्वीच पुण्यात झिका व्हायरसचे 2 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते.त्यानंतर आज पुन्हा 3 रुग्ण आढळले आहेत. पुण्यात अगदी वेगाने झिका व्हायरसचा प्रसार होत आहे. त्यामुळे पुणेकर आणि आरोग्या विभागाची चिंता वाढली आहे. झिकाचा प्रसार रोखण्यासाठी पुण्यात आरोग्य सर्वेक्षण सुरु झालं आहे. झिका व्हायरचा सर्वाधिक धोका गर्भवती महिलांना असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेनं गर्भवती महिलांच्या तपासणीवर सर्वाधिक भर दिला आहे.

ही आहेत झिका व्हायरसची लक्षणे

- सौम्‍य ते उच्‍च ताप

- कन्‍जंक्‍टीव्‍हायटस (डोळे येणे)

- त्‍वचेवर पुरळ/ अॅलर्जी

- डोकेदुखी

- स्‍नायूदुखी व सांधेदुखी

- मळमळ व उलट्या होणे

- अधून-मधून शरीराच्‍या वरील व खालील भागामध्‍ये अशक्‍तपणा जाणवणे

अशी घ्या काळजी

झिकाचे निदान झाल्यानंतर व्यक्तींनी घरामध्येच राहावे. शक्यतो आराम करावा आणि भरपूर पाणी प्यावे. गरोदर महिलांनी विशेषत: संसर्ग झालेल्या व्यक्तींच्या आसपास जाणं टाळावं. या आजावर कोणतेही वेगळे उपचार घेण्याची गरज नाही. तुम्ही स्वत: काळजी घेऊ शकता.

झिका विषाणूपासून संसर्ग होण्‍याला प्रतिबंध करण्‍याचा एकमेव मार्ग म्‍हणजे डास चावण्‍याचा धोका कमी करणे. हे डास सामान्यत: दिवसा चावतात, ज्‍यामुळे तुमच्या घरातील जागा नेहमी स्‍वच्‍छ ठेवा आणि कुठेही पाणी साचणार नाही याची खात्री घ्‍या.

- तुमच्या घराच्या परिसरा डासांचा प्रादुर्भाव असेल तर दरवाजे व खिडक्‍या बंद ठेवावेत.

- डास/ किटकांपासून संरक्षण करणाऱ्या प्रतिबंधकांचा वापर करा.

- फक्‍त उकळलेले / शुद्ध पाणी प्‍या.

- घरामध्‍ये बनवलेले ताजे अन्‍नाचं सेवन करा आणि बाहेरील खाद्यपदार्थांचे सेवन करणं टाळा.

- घरातील हवा खेळती ठेवा.

- बाहेरून आल्‍यानंतर हाताने नाक व तोंडाला स्‍पर्श करू नका.

- नेहमी मुलभूत स्‍वच्‍छता राखा आणि शक्‍य असल्‍यास वारंवार हात स्‍वच्‍छ धुवा.

- तुमची रोगप्रतिकारशक्‍ती कमकुवत असल्‍यास गर्दीच्‍या ठिकाणी जाणे टाळा, ज्‍यामुळे व्‍हायरल संसर्गांचा धोका कमी होईल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+