दिवसातून 10-12 वेळा शरीरसंबंधांची ओढ? सावध व्हा, असू शकतो 'हा' गंभीर मानसिक आजार!
Nymphomania meaning in Marathi : प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता आणि लैंगिक इच्छा ही नैसर्गिकरित्या वेगवेगळी असते. मात्र, जेव्हा ही इच्छा नैसर्गिक मर्यादा ओलांडून एक 'सक्ती' किंवा 'व्यसन' बनते, तेव्हा ते चिंतेचे कारण ठरू शकते.
दिवसातून 10 ते 12 वेळा शरीरसंबंध ठेवण्याची तीव्र इच्छा होणे, ही केवळ शारीरिक भूक नसून ती एक मानसिक स्थिती असू शकते, ज्याला वैद्यकीय भाषेत 'निम्फोमॅनिया' असे म्हणतात.

नेमकी काय आहे ही स्थिती?
निम्फोमॅनिया ही एक अशी मानसिक अवस्था आहे, ज्यामध्ये व्यक्तीला शरीरसंबंधांची अत्यंत तीव्र, अनियंत्रित आणि सक्तीची इच्छा होते.
ही इच्छा इतकी प्रबळ असते की, संबंधित व्यक्ती स्वतःच्या भावनांवर नियंत्रण मिळवू शकत नाही. याचा परिणाम त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर, करिअरवर आणि सामाजिक प्रतिमेवर होतो.
प्रमुख लक्षणे : केवळ इच्छा की आजार?
निम्फोमॅनियाची लक्षणे साध्या लैंगिक इच्छेपेक्षा वेगळी असतात:
अनियंत्रित ओढ : इच्छेविरुद्धही स्वतःला रोखणे अशक्य होणे.
सतत तेच विचार : दिवसभर डोक्यात केवळ शरीरसंबंधांचे विचार रेंगाळणे, ज्यामुळे कामात लक्ष लागत नाही.
धोकादायक वर्तन : परिणामांची पर्वा न करता अनेक अनोळखी भागीदारांशी असुरक्षित संबंध ठेवणे.
दैनंदिन जीवनावर परिणाम : या सवयीमुळे नोकरी जाणे, कुटुंबात वाद होणे किंवा कायदेशीर अडचणी निर्माण होणे.
स्त्री आणि पुरुषांमध्ये वेगवेगळी नावे
हा आजार स्त्री आणि पुरुष दोघांमध्येही आढळू शकतो, परंतु त्यांची नावे वेगवेगळी आहेत.
निम्फोमॅनिया : स्त्रियांमधील अतिलैंगिकतेच्या स्थितीला हे नाव दिले जाते.
सॅटायरियासिस : पुरुषांमध्ये जेव्हा अशाच प्रकारची अनियंत्रित इच्छा निर्माण होते, तेव्हा त्याला सॅटायरियासिस म्हणतात.
हा आजार का होतो?, काय आहे त्यामागील कारणं!
ही स्थिती अचानक निर्माण होत नाही, त्यामागे अनेक शारीरिक आणि मानसिक कारणे असू शकतात.
हार्मोनल असंतुलन : मेंदूतील डोपामाइन आणि सेरोटोनिन सारख्या न्यूरोट्रांसमीटरच्या पातळीत बिघाड झाल्यामुळे ही स्थिती उद्भवू शकते.
मानसिक आघात : बालपणी झालेला लैंगिक छळ किंवा भूतकाळातील एखादा मोठा धक्का (Trauma) याला कारणीभूत ठरू शकतो.
अतिताण : तीव्र मानसिक तणावापासून सुटका मिळवण्यासाठी काही लोक या मार्गाचा अवलंब करतात, ज्याचे नंतर व्यसनात रूपांतर होते.
उपचार शक्य आहेत का?
सीबीटी : ही थेरपी व्यक्तीचे विचार करण्याची पद्धत बदलण्यास आणि सक्तीच्या वर्तनावर नियंत्रण मिळवण्यास मदत करते.
औषधोपचार : डॉक्टरांच्या सल्ल्याने हार्मोन्स संतुलित करणारी किंवा अतिउत्तेजना कमी करणारी औषधे घेता येतात.
सपोर्ट ग्रुप्स : ज्यांना अशा समस्या आहेत, अशा लोकांशी संवाद साधल्याने मानसिक बळ मिळते.












Click it and Unblock the Notifications