गर्भधारणा टाळण्यासाठी महिलांना स्वतः घेता येईल इंजेक्शन; शास्त्रज्ञांनी शोधला नवा मार्ग
एमआयटी म्हणजेच मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या शास्त्रज्ञांनी गर्भधारणा रोखण्यासाठी एक नवीन प्रकारचे इंजेक्शन तयार केले आहे. या इंजेक्शनद्वारे महिलांमध्ये सूक्ष्म क्रिस्टल्स सोडले जातात. हेच क्रिस्टल्स त्वचेखाली एकत्र येऊन हार्मोन्स सोडतात. त्या हार्मोन्समुळे गर्भधारणेसाठी आवश्यक असलेल्या अंड्यांना रोखता येते, असा दावा कऱण्यात आला आहे. विशेष म्हणजे महिलांना हे इंजेक्शन स्वतः घेता येईल, असेही सांगितले जात आहे.

काय आहे दावा
सध्या गर्भधारणा रोखण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रात अनेक उपाय उपयोजिले जातात. त्यात गोळ्या किंवा इतर शरीरात सोडल्या जाणाऱ्या साधनांचा समावेश आहे. यापूर्वीही गर्भधारणा टाळण्यासाठी एक इंजेक्शन दिले जात होते, मात्र त्याचा प्रभाव केवळ तीन महिनेच टिकत होता. आता या डीआयवाय इंजेक्शनमुळे गोळ्या किंवा इतर सर्व साधनांवर चांगला पर्याय शोधला गेल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. या इंजेक्शनची अद्याप मानवांवर चाचणी झालेली नसली तरी, शास्त्रज्ञ त्याच्या प्रभावीतेबद्दल आशावादी आहेत.
काय म्हणतात शास्त्रज्ञ
गर्भनिरोधकांसारख्या अनुप्रयोगांमध्ये दीर्घकाळापर्यंत औषध सोडण्यासाठी SLIM (स्वयं-एकत्रित दीर्घ-अभिनय इंजेक्टेबल मायक्रोक्रिस्टल्स) ची क्षमता सध्याच्या पर्यायांच्या तुलनेत कमी करता येऊ शकते," असे नेचर केमिकल इंजिनिअरिंग जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात म्हटले आहे. या अभ्यासाचे सहलेखक डॉ. जियोव्हानी ट्रॅव्हर्सो यांच्या मते रुग्णाला घरी आरामात इंजेक्शन देता येईल, असा गर्भधारणेपासून वाचण्याचा पर्याय शोधण्याचा आमचा विचार आहे.
रुग्णांसाठी आहे सोयीस्कर
डॉ. ट्रॅव्हर्सो म्हणाले की, " जखम, रक्तस्त्राव किंवा इतर वेदनादायक प्रक्रिया करुन गर्भधारणा टाळता येत होती. मात्र लहनात लहान सुईच्या सहाय्याने गर्भधारणा टाळण्याचे आमचे प्रयत्न सुरु आहेत. त्यांनी पुढे सांगितले की, कमी संसाधनांच्या परिस्थितीत जिथे दररोज गोळ्या घेणे किंवा गर्भनिरोधक उपकरणे बसवणे शक्य नाही, अशा व्यक्तींसाठी नवोपक्रम हा एक सोयीस्कर पर्याय ठरण्याची क्षमता आहे. SLIM [इंजेक्शन] महिलांसाठी उपलब्ध असलेल्या कुटुंब नियोजन पर्यायांच्या सध्याच्या संचात एक नवीन भर असू शकते.
इंजेक्शनचे अनेक फायदे
संशोधकांना अशीही आशा आहे की DIY इंजेक्शनचा वापर गर्भधारणेशिवाय इतर अनेक कामांसाठी होऊ शकतो. HIV, TB, स्किझोफ्रेनिया, जुनाट वेदना आणि चयापचय रोग यासारख्यां आजारांमध्ये महिला रुग्णाला गर्भधारणा बराच काळ थांबवावी लागते. अशा महिला रुग्णांना हे इंजेक्शन उपयोगी पडेल, असे डाँ. टॅव्हर्सो यांचे मत आहे.












Click it and Unblock the Notifications