तुम्ही खात असलेल्या मीठ आणि साखरेत आहे मायक्रोप्लास्टिक..! जाणून घ्या शरीराला किती धोकादायक आहे
मीठ आणि साखर हे दोन पदार्थ आहेत जे जवळजवळ प्रत्येक प्रकारच्या खानपानात आवश्यक असतात. टॉक्सिक्स लिंक या पर्यावरण संशोधन संस्थेने नुकत्याच प्रकाशित केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की जवळजवळ सर्व भारतीय पॅक केलेले किंवा अनपॅक केलेल्या ब्रँडच्या मीठ आणि साखरेत मायक्रोप्लास्टिक्स असतात. "Microplastics in Salt and Sugar" नावाच्या या संशोधनात 10 प्रकारचे मीठ आणि 5 प्रकारच्या साखरेची तपासणी करण्यात आली.
या सर्व नमुन्यांमध्ये मायक्रोप्लास्टिकची मोठ्या प्रमाणावर असल्याचे आढळून आले आहे. मायक्रोप्लास्टिक्स हे अत्यंत लहान प्लास्टिकचे कण आहेत, ते इतके बारीक आणि सूक्ष्म असतात की ते सहज दिसू शकत नाहीत. चला जाणून घेऊया प्लास्टिकचे हे सुक्ष्म कण किती धोकादायक आहेत आणि यामुळे कर्करोगाचा धोका निर्माण होऊ शकतो का?

मायक्रो प्लास्टिकमुळे कर्करोग होऊ शकतो का?
मायक्रो प्लॅस्टिकमुळे थेट कर्करोग होतो, याची पुष्टी अद्याप झालेली नाही. तथापि, यासंदर्भातील काही संशोधनात असे म्हटले आहे की मायक्रो प्लास्टिकमुळे शरीरात सूज आणि इतर समस्या उद्भवू शकतात.
जेव्हा हे कण शरीरात दीर्घकाळ राहतात, तेव्हा ते पेशींना नुकसान पोहोचवू शकतात, ज्यामुळे कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो. टॉक्सिक्स लिंकचे सहयोगी संचालक सतीश सिन्हा यांनी सांगितले की, मायक्रोप्लास्टिकचा आरोग्यावर किती गंभीर परिणाम होऊ शकतो, त्यासाठी मोठ्या प्रमाणावर संशोधन होणे गरजेचे आहे.
मायक्रो प्लास्टिक कसे टाळाल?
- प्लास्टिकचा जपून वापर करा, विशेषतः खाद्यपदार्थ प्लास्टिकमध्ये ठेवणे टाळा.
- नाॅर्मल पाणी पिण्याऐवजी फक्त फिल्टर केलेले पाणी प्या, जेणेकरून त्यातील मायक्रो प्लास्टिक काढून टाकता येईल.
- प्लास्टिकच्या बाटल्यांमधील पाणी पिणे टाळा, कारण यातूनही मायक्रो प्लास्टिकचा धोका उद्भवू असतो.
- रोजच्या जीवनशैलीतून प्लास्टिकचा वापर करणे टाळा
- बाजारातून तयार मसाले विकत घेण्याऐवजी घरीच मसाले बनवायला सुरुवात करा.












Click it and Unblock the Notifications