सिगरेट ओढल्याने होऊ शकतो ओठांचा कॅन्सर, अशी दिसतात लक्षणे
जगभरात कॅन्सरच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कॅन्सर हा असा रोग आहे तो शरीरातील कोणत्याही अवयवात होऊ शकतो. फुफ्फूस, स्तन, पोटाचा कॅन्सर सर्व्हाईकल कॅन्सर याबद्दल तुम्ही एेकलेच असेल, पण ओठांचा देखील कॅन्सर होऊ शकतो हे तुम्हाला माहित आहे का? तुम्हाला या विषयी जाणून घेणे महत्वाचे आहे.
लिप कॅन्सर हा ओठांच्या त्वचेवर होते हा वरच्या किंवा खालच्या ओठावर होऊ शकतो पण खालच्या ओठांवर हा कॅन्सर होणे सामान्य आहे. ओठांचा कॅन्सर हा एक प्रकारे तोंडाचा कॅन्सर मानला जातो. याला स्क्वॅमस सेल कार्सिनोमा म्हटले जाते. ओठांजवळील पेशी असामान्यपऑणे वाढल्याने हा कॅन्सर होतो.

ओठांचा कॅन्सर कसा होतो?
तज्ज्ञ डाॅक्टरांच्या मते, सिगरेट, तंबाकू आणि ओठांवर जास्त वेळ कडक ऊन पडले तर हा कॅन्सर होतो. ओठ काळे पडणे हे देखील या कॅन्सरचा रिस्क फॅक्टर आहे. गो-या रंगाच्या लोकांमध्ये आणि इम्युनिटी कमी असणा-या लोकांमध्ये याचा धोका अधिक असतो. ओठांचा कॅन्सर हटवण्यासाठी साधारणपणे सर्जरी केली जाते पण काही प्रकरणांत किमोथेरपी देखील केली जाते.
-ओठांच्या कॅन्सरचे लक्षण
ओठांचा रंग पांढरा होणे ( व्हाईट पॅच)
-तुमच्या ओठांवरील जी जखम ठीक होत नाही.
-ओठांजवळच किंवा तोंडाजवळची त्वचेत वेदना होणे किंवा बधिरपणा येणे
बचाव कसा कराल?
-तंबाखू खाणे बंद करा, जर तुम्ही तंबाखू खात असाल ते बंद करा.
-तंबाखूचा उपयोग जसं की सिगरेट यामुळे तुमच्या ओठांच्या पेशी घातक केमिकलच्या संपर्कात येते, जे कॅन्सरचे कारण बनते.
-कडक उन्हात जाणे टाळा












Click it and Unblock the Notifications