Skin Health : हिवाळ्यात त्वचा मुलायम आणि चमकदार ठेवण्यासाठी ' 3 सोप्या गोष्टी' ठरेल वरदान!
How To Use Coconut Oil On Face In Winter : हिवाळ्यातील थंड वारे त्वचेतील नैसर्गिक ओलावा शोषून घेतात, ज्यामुळे त्वचा कोरडी आणि निस्तेज बनते. यामुळे चेहऱ्यावर पुरळ, डाग, पिगमेंटेशन आणि अकाली सुरकुत्या अशा समस्या वाढू लागतात. अशावेळी त्वचेला हायड्रेटेड आणि मॉइश्चराइज्ड ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असते. यासाठी स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेले नारळाचे तेल एक नैसर्गिक आणि प्रभावी उपाय आहे.
नारळाच्या तेलात असलेले हेल्दी फॅट्स आणि अँटिऑक्सिडंट्स त्वचेला खोलवर पोषण देतात, तर अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म त्वचेच्या समस्यांशी लढण्यास मदत करतात.

हिवाळ्यात चेहऱ्यावर नारळ तेल वापरण्याचे ३ खास मार्ग
१. रात्रीच्या वेळी मसाज
कृती : रात्री झोपण्यापूर्वी ३ ते ४ थेंब नारळ तेल तळहातावर घ्या आणि ते चेहऱ्यावर लावा. गोलाकार पद्धतीने ५ मिनिटे हलक्या हातांनी मसाज करा.
फायदा: हे तेल त्वचेला रात्रभर ओलावा प्रदान करते, ज्यामुळे सकाळी उठल्यावर तुमची त्वचा मऊ (Soft) आणि चमकदार दिसेल. कोरड्या आणि निर्जीव त्वचेपासून यामुळे मुक्ती मिळते.
२. नारळ तेल आणि मध
कृती : २ चमचे नारळ तेल घ्या आणि त्यात १ चमचा मध (Honey) मिसळा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मसाज करा. सुमारे ३० मिनिटांनी चेहरा सामान्य पाण्याने धुवा.
फायदा: मध त्वचा मॉइश्चराइज्ड ठेवते, तर नारळ तेल डाग-धब्बे, पिगमेंटेशन आणि पिंपल्स कमी करण्यास मदत करते. या फेस मास्कमुळे त्वचा निरोगी राहते.
३. नारळ तेल आणि कोरफड
कृती : एका वाटीत २ चमचे ताजे कोरफड जेल आणि २ चमचे नारळ तेल घेऊन चांगले मिसळा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि ३० मिनिटांनी धुवा.
फायदा : कोरफड जेल त्वचेला हायड्रेटेड ठेवते, तर नारळ तेल पोषण देते. यामुळे त्वचा मऊ होते, तसेच त्वचेचे डाग, मुरुम आणि टॅनिंग कमी होण्यास मदत मिळते.
(महत्त्वाची टीप : जरी नारळ तेल त्वचेसाठी खूप फायदेशीर असले तरी, ज्यांची त्वचा अत्यंत तेलकट किंवा संवेदनशील आहे आणि ज्यांना वारंवार पुरळ येतात, त्यांनी नारळ तेल थेट चेहऱ्यावर लावण्यापूर्वी पॅच टेस्ट नक्की करावी. कारण नारळ तेल काही त्वचेसाठी 'कोमेडोजेनिक' असू शकते, ज्यामुळे छिद्रे बंद होऊ शकतात.
-
Eid mubarak 2026 wishes marathi : आपल्या जोडीदाराला पाठवा 'हे' रोमँटिक ईद शुभेच्छा संदेश आणि शायरी! -
KVS Admission पालकांनो, केंद्रीय विद्यालयांचा प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी 'ही' कागदपत्रे ठेवा तयार ठेवा -
जगातील आनंदी देशांची यादी जाहीर! भारत कितव्या स्थानावर? वाचा भारत की पाकीस्तान कोण जास्त सुखी? -
आजचे राशीभविष्य: मेष ते मीन, कोणाला मिळणार धनलाभ आणि कोणाला राहावे लागेल सावध? -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
जपानचे PM अमेरिकेशी मैत्री वाढवासाठी आले अन् ट्रम्प यांनी खोचक उत्तर देऊन जुन्या जखमांवर मीठ चोळले! -
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
सोनं झालं स्वस्त! युद्धाच्या काळातही दरात 'एवढ्या' हजारांची ऐतिहासिक घसरण; खरेदी करावं की थांबावं? -
Dhurandhar 2 : धुरंधर-2 चा बॉक्स ऑफिस धमाका! दुसऱ्याच दिवशी 'एवढा' गल्ला, मोडला जवान, ॲनिमलचा विक्रम -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी






Click it and Unblock the Notifications