चहाच्या नावावर तुम्ही विष तर पीत नाही? अशी ओळखा भेसळ
अन्नपदार्थांमध्ये भेसळीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे पचनसंस्थेवर विपरीत परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला खाद्यपदार्थांमधील भेसळीच्या घातक दुष्परिणामांपासून वाचणे कठीण होत चालले आहे. जर तुम्हाला चहा पिण्याची सवय असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.
कारण काही दिवसांपुर्वी ओडिशातील कटक येथे अन्न व औषध विभागाने बनावट चहा बनवणाऱ्या एका कंपनीवर छापा टाकला होता. या कंपनीत मोठ्या प्रमाणात बनावट चहापत्ती तयार केली जात होती आणि ती देशभरात पुरवली जात होती. अशा परिस्थितीत, तुमच्या आरोग्यावर निर्माण झालेला धोका लक्षात घेऊन आम्ही तुम्हाला नकली चहा पत्ती कशी ओळखायची? याबद्दल माहिती देत आहोत.

भेसळयुक्त चहाची पाने तुटू शकतात. त्यामध्ये देठ, दगड किंवा धूळ देखील असू शकते. याशिवाय, त्यात अनेक प्रकारचे हानिकारक कृत्रिम रंग किंवा फ्लेवर्स असू शकतात ज्यामुळे तुम्हाला अनेक गंभीर आजार होऊ शकतात.
लिंबाच्या रसाने शोध
एका काचेच्या भांड्यात लिंबाचा रस टाका आणि त्यात चहाची पाने घाला. काही मिनिटांनंतर, लिंबाचा रस पिवळा किंवा हिरवा झाला तर ती पाने खरी आहेत. जर चहाची पाने बनावट असतील तर लिंबाचा रस केशरी होईल. यावरुन खरे आणि बनावट चहाची पानांत फरक ओळखू शकता.
पानांच्या रंगावरून ओळखा
खऱ्या चहाच्या पानांचा रंग हिरवा, लाल आणि काळा असतो, बनावट चहाच्या पानांमध्ये हा रंग हलका किंवा अस्पष्ट असू शकतो.
पाण्याच्या रंगावरून ओळखा
भेसळयुक्त चहाच्या पानात कृत्रिम रंग टाकला जातो. ते ओळखण्यासाठी थंड पाण्यात चहाची पाने टाका. जर दुसरा रंग सोडत असेल तर चहाची पाने बनावट आहेत हे समजून घ्या, कारण खऱ्या चहाच्या पानांना पाणी उकळल्यानंतरच रंग येतो.
नकली चहा पिण्याचे तोटे
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, भेसळयुक्त चहा प्यायल्याने शरीराला अनेक गंभीर हानी होऊ शकते. सतत निकृष्ट दर्जाचा चहा प्यायल्याने कर्करोग आणि अनेक अवयव निकामी होण्यासारखे आजार होऊ शकतात. भेसळयुक्त चहामध्ये रंग किंवा डाईची भेसळ असते जी आपल्या शरीराहाला हानी पोहोचवते आणि विषासारखे कार्य करते.












Click it and Unblock the Notifications