Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Holi Tips : होळीचा रंग खेळताना डोळ्याची काळजी कशी घ्याल, फॉलो करा 'या' टिप्स, तुम्हाला होईल फायदा

Holi 2025 : होळी म्हणजेच आनंदोत्सव. होळीला ज्या पद्धतीने रंग खेळले जातात. एकमेकांच्या प्रेमाच्या रंगात सर्वजण भिजून जातात. होळाचा हा सण आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. अनेक जण हा उत्सव वनस्पती आणि फुलांपासून बनवलेले नैसर्गिक रंग लावून साजरा करतात. मात्र, सध्या, होळीसाठी वापरण्यात येणारे रंग हे रसायनायुक्तच असतात. परंतु, सावधान होण्याची गरज आहे. कारण हे रंग आरोग्यास हानिकारक असतात. त्यामुळे अनेकांना डोळ्यांच्या आणि त्वचेच्या समस्यांचा सामना करावा लागतो.

Holi Tips

होळीचा रंग कसा बनवला जातो?

होळीला रंगाची पावडर तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे पदार्थ हे एस्बेस्टोस, खडूंची भुकटी, सिलिका इत्यादी पासून बनवलेले असतात. त्यानंतर इंजिन तेल किंवा निकृष्ट दर्जाच्या तेलांमध्ये हे रंग मिसळून रंगीत पेस्ट तयार केल्या जातात. हे सर्व रासायनिक पदार्थ त्वचा, डोळे आणि श्वसनसंस्थेसाठी हानिकारक असतात.

रंगांमुळे डोळ्यांच्या समस्या उद्भवतात?

होळीचा रंग खेळताना खूप काही काळजी घेतली जात नाही. जेव्हा रंग डोळ्यांच्या संपर्कात येतात तेव्हा डोळ्यांना एलर्जी होऊ शकते. डोळ्यांच्या पापणीला आतून सूज येणे, डोळ्याची आग होणे, इत्यादी समस्या तुम्हाला होळीत लावल्या जाणाऱ्या रंगामुळे जाणवू शकतात. केवळ रंगच नाही तर रंग एकमेकांना लावण्यासाठी जाणार्‍या पिचकारीसारख्या वस्तू आणि पाण्याचे फुगे फोडल्याने देखील डोळ्यांना इजा होऊ शकते.

होळी खेळताना डोळ्यांची काळजी कशी घ्याल, फॉलो करा या टिप्स..!

  • शक्यतो होळी खेळताना नैसर्गिक रंगांचा वापर करा.
  • होळी खेळताना गॉगल घातला तर अधिकच उत्तम होईल.
  • केसांवर टाकलेले रंगीत पाणी डोळ्यांमध्ये जाऊ नये, यासाठी केस बांधा किंवा टोपी घाला.
  • एखादी व्यक्ती तुम्हाला रंग लावत असेल तर डोळे बंद करा.
  • डोळ्यांमध्ये कॉन्टॅक्ट लेन्स घालून कधीही होळी खेळू नका कारण अशानं रंग डोळे आणि लेन्समध्ये अडकतात, ज्यामुळे डोळ्यांवर वाईट परिणाम होऊ शकतो.
  • जर रंग किंवा रंग मिक्स केलेलं पाणी डोळ्यांत गेले तर डोळे चोळू नका. लगेच स्वच्छ पाण्याने फक्त डोळे धुवा.
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+