heart blockage symptoms : 'ही' लक्षणे दिसली तर समजून घ्या, हृदयात ब्लॉकेज वाढलेत, वेळीच व्हा सावध!
Heart Blockage Symptoms 6 warning signs : मानवी शरीराचे सर्वात महत्त्वाचे इंजिन म्हणून हृदय असते. हृदयाचा ठोका चूकला तर मानवी जीवन थांबले. हृदय हे इंजिन २४ तास काम करून आपल्या शरीराला रक्त पुरवठा करते. परंतु, जेव्हा या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा अर्थात ब्लॉकेज निर्माण होतो, तेव्हा अनेक गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.
हृदयातील अडथळा हळूहळू विकसित होत असला तरी, आपले शरीर काही संकेत देत असते. जर तुम्हाला खालील प्रमाणे 6 लक्षणे दिसून येत असतील तर त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या, जेणेकरून तुम्ही भविष्यातील मोठ्या अडथळ्यांवर मात करू शकता..!

छातीत दुखणे आणि जडपणा
छातीत अचानक दाब, जळजळ किंवा जडपणा जाणवणे हे हृदयाच्या अडथळ्याचे सर्वात सामान्य लक्षण आहे. याला वैद्यकीय भाषेत "एनजाइना" म्हणतात. ही वेदना फक्त छातीपुरती मर्यादित नसते, तर ती खांदे, हात, मान किंवा पाठीच्या भागापर्यंतही पसरू शकते. जर तुम्हाला हे वारंवार जाणवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.
श्वास घेण्यास त्रास
अगदी थोडे चालल्यानंतर किंवा पायऱ्या चढल्यानंतर तुम्हाला दम लागत असेल, तर ते हृदयातील ब्लॉकेजचे लक्षण असू शकते. अडथळ्यामुळे हृदयापर्यंत पुरेसा ऑक्सिजन पोहोचत नाही, ज्यामुळे श्वास घेण्यास अडचण येते.
सतत थकवा आणि अशक्तपणा
दिवसभर कोणतेही जास्त शारीरिक काम न करताही तुम्हाला थकवा जाणवत असेल किंवा रात्रीची पूर्ण झोप घेतल्यानंतरही अशक्तपणा येत असेल, तर ते हृदयाच्या समस्येचे संकेत असू शकते. अपुऱ्या रक्तपुरवठ्यामुळे शरीराला पुरेशी ऊर्जा मिळत नाही, त्यामुळे सतत थकवा जाणवतो.
चक्कर येणे किंवा बेशुद्ध होणे
हृदयातील अडथळ्यामुळे मेंदूपर्यंत रक्तप्रवाह योग्य प्रकारे पोहोचत नाही. यामुळे अचानक चक्कर येणे, डोळ्यासमोर अंधारी येणे किंवा काही वेळा बेशुद्ध होणे असे प्रकार घडू शकतात. हे केवळ अशक्तपणामुळे होत आहे असे समजण्याची चूक करू नका.
पाय आणि बोटांना सूज येणे
जर तुमचे हृदय योग्य प्रकारे काम करत नसेल तर शरीरातील द्रवपदार्थ साठून राहतात, ज्यामुळे पाय, घोटे आणि बोटांवर सूज येऊ शकते. याला वैद्यकीय भाषेत एडेमा (Edema) म्हणतात. हे हृदयातील अडथळ्याचे किंवा हृदय निकामी होण्याचे प्रारंभिक लक्षण असू शकते.
जास्त घाम येणे
कोणत्याही शारीरिक श्रमाशिवाय किंवा जास्त उष्णता नसतानाही तुम्हाला खूप घाम येत असेल, तर ते हृदयावरील ताणाचे लक्षण असू शकते. जेव्हा हृदय रक्त पंप करण्यासाठी जास्त प्रयत्न करते, तेव्हा शरीराचे तापमान वाढते आणि जास्त घाम येतो. विशेषतः छातीत दुखण्यासोबत घाम येणे हे हृदयविकाराच्या झटक्याचे गंभीर लक्षण मानले जाते.
जर तुम्हाला यापैकी कोणतीही लक्षणे वारंवार जाणवत असतील, तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. वेळीच योग्य उपचार घेऊन तुम्ही गंभीर आजारांना टाळू शकता.
(महत्त्वाची सूचना : वरील माहिती केवळ ज्ञानवृद्धीसाठी आहे, यातून कोणताही आरोग्यविषयक सल्ला नाही. तुम्ही तुमच्या डॉक्टरांना विचारून आरोग्य सल्ला घ्यावा.)












Click it and Unblock the Notifications