तुम्हीही प्रायव्हेट पार्ट्सवर हेअर रिमूव्हल क्रीम लावता का? जाणून घ्या त्याचे दुष्परिणाम
Hair removal cream disadvantages : अनेक मुली प्रायव्हेट पार्ट्सवरील केस काढण्यासाठी शेव्हिंगपासून वॅक्सिंगचा आधार घेतात. पण बहुतेकजणी हेअर रिमूव्हल क्रीम वापरतात. गुप्तांगाजवळील केस काढून टाकणारी क्रीम वापरताना काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे, कारण त्यात अनेक प्रकारची रसायने असतात, ज्यामुळे या संवेदनशील भागावर अनिष्ट परिणाम होऊ शकतो, असे तज्ज्ञ सांगतात.
अशा क्रिमचे काही दुष्परिणाम आहेत. जे व्हजाईनल हेल्थवर परिणाम करू शकतात. ही पद्धत सर्वात सोपी असली तरी तिचे बरेच तोटे आहेत. तज्ज्ञांच्या मते त्याचे दुष्परिणाम काय आहेत हे बघूया.

त्वचेची जळजळ
हेअर रिमूव्हल क्रीममध्ये असलेल्या रसायनांमुळे त्वचेची जळजळ, खाज सुटणे आणि लालसरपणा होऊ शकतो. त्वचा संवेदनशील असताना ही समस्या अधिक वाढू शकते.
संसर्गाचा धोका
या भागातील त्वचेचा थर पातळ असतो, त्यामुळे रसायने जिवाणू किंवा बुरशीजन्य संसर्गाचा धोका वाढू शकतो.
ऍलर्जीक रिअॅक्शन
काही लोकांना क्रीममध्ये असलेल्या रसायनांची ऍलर्जी असू शकते. यामुळे पुरळ, सूज किंवा चिडचिड होऊ शकते.
पीएच पातळीचे असंतुलन
हे क्षेत्र एका विशिष्ट पीएच स्तरावर चालते आणि केस काढण्याच्या क्रीमच्या वापरामुळे या पातळीमध्ये असंतुलन होऊ शकते, यामुळे व्हजायनल फ्लोरामध्ये बदल होऊ शकतात.
वारंवार वापराने त्वचा पडू शकते काळी
हेअर रिमूव्हल क्रीमचा वारंवार वापर केल्याने त्वचा काळी पडू शकते किंवा हायपरपिग्मेंटेशन होऊ शकते.
सुरक्षित पर्याय
- वॅक्सिंग, शेव्हिंग किंवा ट्रिमिंग सारख्या नैसर्गिक पद्धतींचा अवलंब करा.
- पॅच टेस्ट करून पहा, प्रथम एका छोट्या भागावर क्रीम लावा आणि तुमच्या त्वचेवर काही रिअॅक्शन होते का ते तपासा.
- कोणत्याही प्रकारची ऍलर्जी किंवा चिडचिड झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. अशाप्रकारे, तुमच्या योनीमार्गाच्या आरोग्याची काळजी घेताना तुम्ही केस काढण्यासाठी योग्य पर्याय निवडू शकता.












Click it and Unblock the Notifications