पुण्यात दुर्मिळ गुइलेन बॅरे सिंड्रोमचे तब्बल 22 संशयित रुग्ण! 'हा' आजार काय अन् किती धोकादायक? वाचा
Guillain Barre Syndrome Cases DEtected in Pune : पुणे शहरात दुर्मिळ अशा गुइलेन बॅरे सिंड्रोम व्याधीने ग्रस्त तब्बल 22 संशयित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोनानंतर एचएमपीव्ही व्हायरस आणि आता दुर्मिळ गुईलेन बॅरे सिंड्रोममुळे लोकांमध्ये अनेक शंका कुशंका निर्माण झाल्या आहेत.
मुळातः हा सिंड्रोम काय, आजार काय या आजारावर उपाय काय करायचे अशा अनेक गोष्टी पुणेकरांना माहित नाही, पण या आजाराचे तब्बल 22 रुग्ण आढळल्याने आता या आजाराविषयी माहिती मिळवण्याचा प्रयत्न होत आहे.

फोटो ः संग्रहीत
पुण्यात एका महिलेला या व्याधीनं ग्रासल्यानंतर डॉक्टरांच्या पथकाने तिच्यावर यशस्वीपणे उपचार केले असून तू पुर्णपणे बरी झाल्याची माहिती समोर आली आहे, असे असले तरीही या आजाराचे 22 संशयित रुग्ण आढळले आहेत अशी माहिती पुणे महानगर पालिकेने दिली असल्याचे वृत्त लोकसत्ता डाॅट काॅम संकेतस्थळावर प्रकाशित झाले आहे.
सिंड्रोमशी निगडीत रुग्ण सिंहगड परिसरातील
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय व पूना हॉस्पिटलमध्ये या आजाराशी संबंधित लक्षणं आढळल्याची तक्रार असणारे रुग्ण दाखल झाल्यानंतर ही माहिती महानगर पालिकेला कळवण्यात आली आहे.
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय व पूना हॉस्पिटल या दोन रुग्णालयांमध्ये या व्याधीशी संबधित लक्षणं दिसून आल्याची तक्रार घेऊन रुग्ण दाखल झाले आहेत. हे रुग्ण प्रामुख्याने सिंहगड रोड परिसरातले असल्याचं इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. या दोन रुग्णालयांव्यतिरिक्त इतरही रुग्णालयांमध्ये काही संशयित रुग्णांना दाखल करण्यात आलं आहे.
प्रशासनाकडून काय सुरु आहेत उपाय
- मनपाचे आरोग्य प्रशासनाने सध्या या भागातील एकूण सहा रुग्णांच्या रक्ताचे नमुने गोळा केले आहेत.
- हे सर्व नमुने इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च - नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ व्हायरोलॉजी (ICMR-NIV) कडे पाठवण्यात आले आहेत.
जुलाब, ताप अन् अशक्तपणा
- सिंहगड रस्ता आणि आसपासच्या परिसरातील रुग्णांकडून जुलाब, ताप आणि अशक्तपणासारख्या तक्रारी केल्या जात आहेत.
- या रुग्णांना गुईलेन बॅरे सिंड्रोमची लागण झाल्याचे दिसून आले आहे.
- गेल्या आठवड्याभरातच दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल झालेल्या सोळा रुग्णांनी ही लक्षणे जाणवत असल्याचे सांगितले. त्यात सहा लहान मुलांचा समावेश आहे.
- हे सर्व रुग्ण धायरी, सिंहगड रोड आणि किरकटवाडी परिसरातले होते. या सोळापैकी आठ रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.
गुइलेन बॅरे सिंड्रोमबद्दल सविस्तर
- गुइलेन बॅरे सिंड्रोम हा एक दुर्मीळ आजार आहे.
- दर वर्षी 1 लाख लोकांमध्ये एका व्यक्तीला हा आजार होतो.
- या आजाराचे निदान गुंतागुंतीचे असते. चेतासंस्थेच्या चाचण्या आणि स्पायनल फ्लुइड चाचण्या याच्या निदानासाठी आवश्यक असतात.
- आयव्हीआयजी अथवा प्लाझ्मा एक्स्चेंजसारख्या उपचारांमुळे रुग्णाला लवकरात लवकर आरोग्यदायी मदत मिळू शकते.
- या आजाराचे बहुतेक रुग्ण बरे होत असले, तरी 20 टक्के रुग्णांना सहा महिन्यांनंतरही हालचालींमध्ये अडचणी येतात.












Click it and Unblock the Notifications