Guillain-Barre Syndrome: पुण्यात गिलेन-बॅरे सिंड्रोमचे 73 रुग्ण, हा आजार किती धोकादायक आहे?

Guillain-Barre Syndrome : पुण्यात गिलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) चे सहा नवीन संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे पुण्यात आता 73 संशयित रुग्ण आहेत. त्यापैकी बहुतेकांची प्रकृती गंभीर आहे आणि ते व्हेंटिलेटर सपोर्टवर आहेत. राज्य आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार जीबीएसच्या एकूण रुग्णांची संख्या 73 झाली आहे. ज्यामध्ये 47 पुरुष आणि 26 महिला आहेत. यापैकी 14 जण व्हेंटिलेटर सपोर्टवर आहेत.

दरम्यान आरोग्य विभागाने अचानक वाढलेल्या रुग्णांच्या तपासासाठी आपले प्रयत्न तीव्र केले आहेत. या आठवड्याच्या सुरुवातीला संशयित प्रकरणांची संख्या 24 ने वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर रॅपिड रिस्पॉन्स टीम (RRT) ची स्थापना करण्यात आली आहे. पुण्यात एका आठवड्यात 20 हून अधिक संशयित रुग्ण आढळणे हा आरोग्य विभागासाठी चिंतेचा विषय बनला आहे.

Guillain-Barre Syndrome

फाईल फोटो

गुइलेन-बॅरे सिंड्रोम म्हणजे काय?

गुइलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) हा एक दुर्मिळ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे. ज्यामुळे चालणे, उठणे, बसणे आणि श्वास घेण्यात अत्यंत त्रास होऊ शकतो. ही एक स्वयंप्रतिकार स्थिती आहे. यामध्ये आपली रोगप्रतिकारक शक्ती स्वतःच्या नसांवर हल्ला करते. ज्यामुळे न्यूरोलॉजिकल विकार होतात.

गुइलेन-बॅरे सिंड्रोममध्ये हात आणि पाय कमकुवत होतात, श्वास घेणे कठीण होते आणि उठणे किंवा बसणे देखील कठीण होते. डॉक्टर म्हणतात की, हा एक धोकादायक आजार आहे. एका आकडेवारीनुसार दरवर्षी जगभरात या आजाराचे एक लाख रुग्ण आढळतात.

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते गुइलेन-बॅरे सिंड्रोम हा एक दुर्मिळ न्यूरोलॉजिकल आजार आहे. या सिंड्रोममध्ये, स्नायूंच्या हालचाली नियंत्रित करणाऱ्या आणि वेदना, तापमान आणि स्पर्श संवेदना वाहून नेणाऱ्या नसा प्रभावित होतात, ज्यामुळे स्नायू कमकुवत होतात, पाय आणि हातांमध्ये वेदना होतात आणि गिळण्यास आणि श्वास घेण्यास त्रास होतो.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+