Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मोठी बातमी : पुण्यात GBS आजाराचा तिसरा बळी! ससून रुग्णालयात महिलेचा मृत्यू, 20 रुग्ण व्हेंटीलेटरवर

GBS disease 3rd victim in Pune Woman dies : गुलीयन बॅरी सिंड्रोम (GBS) ने ग्रस्त तिसऱ्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेली महिला पुण्याची असून ती 56 वर्षांची होती. ससून रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. आता या आजाराने मृत झालेल्यांची संख्या तीनवर पोहचली आहे. तर या आजाराचे जवळपास वीस रुग्ण कृत्रिम जीवरक्षक प्रणाली अर्थात व्हेंटीलेटरवर आहेत.

पुणे शहरात गुलीयन बॅरी सिंड्रोममुळे महिलेचा ससून रुग्णालयात गेलेला बळी हा पुण्यातील पहिला मृत्यू ठरला आहे. यापुर्वी धायरीत एका 40 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान 25 जानेवारीला सोलापुरात मृत्यू झाला होता.

GBS disease 3rd victim in Pune Woman dies

प्राप्त माहितीनुसार, मृत्यू झालेल्या 56 वर्षीय रुग्ण महिलेला ताप आला होता. तिला 15 जानेवारीला अशक्तपणा आला होता. यातच अर्धांगवायूची महिलेमध्ये लक्षणे दिसत होती. त्यामुळे या महिलेला 17 जानेवारीला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तिथे तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

'या' होत्या मृत रुग्णाला व्याधी

अर्धांगवायुमुळे महिलेची प्रकृती ढासळली होती. यातच तिला श्वास घ्यायला अडचण येत होती, तिला श्वसननलिकेत संसर्ग झाला होता तर फुफ्फुसातही संसर्ग झाला होता, प्राप्त माहितीनुसार या महिलेला मुखाचा कर्करोगही होता.

गुलीयन बॅरी सिंड्रोमविषयी सविस्तर

काय आहे हा आजार?

GBS मध्ये, शरीराची रोगप्रतिकारक यंत्रणा चुकून मज्जासंस्थेवर हल्ला करते, ज्यामुळे स्नायू कमकुवत होणे, सुन्न होणे आणि कधीकधी अर्धांगवायू यांसारखी लक्षणे दिसतात. चला जाणून घेऊया हा आजार किती धोकादायक आहे?

गुइलेन बॅरे सिंड्रोम गुइलेन बॅरी सिंड्रोम म्हणजे काय?

गुइलेन बॅरी सिंड्रोम (GBS) हा एक दुर्मिळ आणि गंभीर स्वयंप्रतिकार विकार आहे ज्यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक यंत्रणा चुकून परिधीय नसावर हल्ला करते. या हल्ल्यामुळे सूज येते आणि मज्जातंतूंना नुकसान होते, ज्यामुळे स्नायू कमकुवत होतात, मुंग्या येणे, सुन्न होणे आणि कधीकधी गंभीर प्रकरणांमध्ये श्वास घेण्यास त्रास होतो.

या आजाराचे नेमके कारण काय?

  • या आजाराचे नेमके कारण अद्याप ज्ञात नाही, परंतु सामान्यतः हा विषाणू किंवा बॅक्टेरियाच्या संसर्गासारख्या संसर्गानंतर विकसित होतो.
  • फ्लू, डेंग्यू किंवा गॅस्ट्रोइंटेस्टाइनल इन्फेक्शननंतर अनेक प्रकरणांमध्ये GBS आढळून आले आहे. यानंतर रुग्णांनी लगेच डाॅक्टरांचा सल्ला घेणे अपेक्षित आहे. कारण योग्य उपचाराने रुग्णाची स्थिती सुधारते.

गुइलेन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) ची लक्षणे

गुइलेन बॅरी सिंड्रोम (GBS) च्या प्रमुख लक्षणांमध्ये स्नायूंमध्ये अचानक कमजोरी

  • विशेषत: पाय आणि हातांमध्ये मुंग्या येणे किंवा सुन्न होणे यांचा समावेश होतो.
  • रुग्णाला संतुलन राखण्यात आणि चालण्यात अडचण येऊ शकते.
  • गंभीर प्रकरणांमध्ये, श्वास घेण्यात अडचण, जलद हृदयाचे ठोके आणि रक्तदाबात बदल देखील दिसून येतात.
  • ही लक्षणे वेगाने वाढू शकतात, ज्यामुळे परिस्थिती गंभीर होऊ शकते. वेळेवर उपचार करून लक्षणे नियंत्रित करता येतात.
  • Guillain Barrie सिंड्रोम (GBS) वर त्वरित आणि काळजीपूर्वक उपचार आणि व्यवस्थापित केले पाहिजे.

गुइलेन बॅरी सिंड्रोमचा उपचार

1. इम्युनोग्लोबुलिन थेरपी (IVIG) : ही थेरपी रोगप्रतिकारक शक्ती नियंत्रित करण्यास मदत करते.

2. प्लाझ्मा फेरेसिस : यामध्ये रक्तातील हानिकारक अँटीबॉडी काढून मज्जासंस्थेला होणारे नुकसान टाळले जाते.

3. स्वच्छतेकडे लक्ष द्या : संसर्ग टाळण्यासाठी स्वच्छतेची विशेष काळजी घ्या.

4. खबरदारी : तुम्हाला स्नायू कमकुवत होणे, मुंग्या येणे किंवा इतर लक्षणे जाणवल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.

5. संसर्गानंतर खबरदारी : कोणत्याही संसर्गानंतर शरीरात होणाऱ्या बदलांकडे दुर्लक्ष करू नका.

वेळेवर उपचार करून स्थिती सुधारणे शक्य आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+