माजी क्रिकेटपटू संजय बांगर यांचा मुलगा आर्यन बनला अनाया; काय आहे हार्मोनल रिप्लेसमेंट प्रक्रिया

माजी क्रिकेटपटू संजय बांगर यांचा मुलगा आर्यन बांगर आता अनाया बनला आहे. लिंगबदल प्रक्रियेतून जाताना आर्यनने आपल्या आयुष्यातील एका नव्या ओळखीचा स्वीकार केला आहे. त्याने असा निर्णय का घेतला अन् त्याची संपूर्ण कहाणी काय आहे, हे जाणून घेऊया..!

हार्मोनल रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया

भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू संजय बांगर यांचा मुलगा आर्यन बांगर याने नुकतीच हार्मोनल रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया करून लिंगबदल केलाय. आता तो एक मुलगी म्हणून अनाया या नावाने ओळखला जातो. आर्यनने आपल्या परिवर्तनाची रील इन्स्टाग्रामवर शेअर केली. त्यावर त्याने आपल्या संघर्षाच्या प्रवासाबद्दलही सांगितले आहे.

Aryan became Anaya

आर्यन म्हणतो- माझा क्रिकेटप्रती असलेला प्रवास तितकाच महत्त्वाचा होता, पण स्वत:ला ओळखण्यासाठी मला कठोर निर्णय घ्यावा लागला. या प्रवासात मला बरेच आव्हानांना सामोरे जावे लागले."

अशी असते शस्त्रक्रिया

आर्यनच्या लिंगबदल प्रक्रियेचा प्रवास साधा नव्हता. आरोग्यतज्ज्ञ सांगतात की लिंगबदल ही एक दीर्घ आणि खर्चिक प्रक्रिया असते. यात मनोवैज्ञानिक मूल्यांकनानंतर हार्मोन थेरपी दिली जाते, ज्यामुळे शारीरिक बदल होऊ शकतात. त्यानंतर, रुग्णाच्या शरीरात विविध शस्त्रक्रिया केल्या जातात, ज्यामुळे त्याच्या स्वरूपात बदल होतो.लिंग बदलल्यानंतर आर्यनने अनायाचे जीवन स्वीकारले असून त्याचे हृदयपूर्वक स्वागत केले जात आहे.

हे आहेत शस्त्रक्रियेतील धोके!

लिंगबदल प्रक्रियेचे काही धोकेही असतात. हार्मोनल बदलामुळे काही मानसिक विकारांचा धोका वाढतो, आणि काही वैद्यकीय प्रक्रियांच्या कमतरतेमुळे संसर्ग होण्याची शक्यता असते. लिंग बदललेले लोक मुल जन्म घालू शकत नाहीत, त्यामुळेही या निर्णयाचा विचारपूर्वक विचार केला जातो.

ही घटना समाजातील अनोख्या ओळखांना स्वीकारण्याची प्रेरणा देते. आर्यन बांगर, आता अनाया, तिने घेतलेला निर्णय हा खरोखरच धाडसाचा आहे. तिच्या या नव्या प्रवासासाठी तिला शुभेच्छा!

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+