PresVu Eye Drop म्हणजे काय, ज्याचे दोन थेंब तुम्हाला चष्मा घालवण्यास मदत होईल
PresVu Eye Drop: चष्मा घालणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईतील एका फार्मा कंपनीने असा आय ड्रॉप तयार केला आहे, जो चष्मा काढण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. या नवीन आय ड्रॉप्सला ड्रग रेग्युलेटरी एजन्सी ऑफ इंडिया (DCGI) ने हिरवा सिग्नल देखील दिला आहे.
या आय ड्रॉप कंपनीच्या निर्मात्यांनी दावा केला आहे की, हे औषध प्रेसबायोपियाच्या समस्येने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी खूप फायदेशीर सिद्ध होईल. या आय ड्रॉपचे वैशिष्ट्य म्हणजे एक थेंब अवघ्या 15 मिनिटांत प्रभाव दाखवतो आणि त्याचा प्रभाव 6 तास टिकतो. त्याची किंमत केवळ 350 रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
या औषधाचे इतरही अनेक फायदे आहेत
PresVu हा भारतातील पहिला आय ड्रॉप आहे, जो प्रिस्बायोपियाने ग्रस्त असलेल्या लोकांमध्ये वाचन करताना चष्म्याची गरज कमी करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. हा आय ड्रॉप केवळ वाचन करताना चष्म्याची गरजच नाही तर डोळे कोरडे होण्यापासून वाचवतो. तथापि, हे औषध काउंटरवर उपलब्ध होणार नाही. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवरच दिले जाईल. दाव्यानुसार, हे औषध 40 ते 55 वर्षे वयोगटातील लोकांसाठी अतिशय फायदेशीर ठरेल ज्यांना सौम्य ते मध्यम प्रेसबायोपियाचा त्रास आहे.

असे करेल काम
प्रेस्बायोपिया सहसा 40 वर्षांनंतर होतो. त्यामुळे जवळच्या वस्तू पाहण्याची क्षमता कमी होऊ लागते. वय वर्ष 60 च्या शेवटी डोळे पूर्णपणे खराब होतात. एन्टोड मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल के मसुरकर यांचा दावा आहे की, या ड्रॉपचे थेंब टाकल्यानंतर 15 मिनिटानंतर त्याचा प्रभाव दिसू लागतो. तो पुढील सहा तास टिकतो. पहिल्या थेंबाच्या तीन तासांच्या आत दुसरा थेंब टाकल्यास, प्रभाव जास्त काळ टिकेल असं, या दाव्यात म्हटलं आहे.
250 लोकांवर केली चाचणी
आत्तापर्यंत प्रिस्बायोपियाने ग्रस्त असलेल्या लोकांना फक्त चष्मा किंवा कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर करावा लागत होता. एन्टोड फार्मास्युटिकल्स सध्या फक्त ENT आणि त्वचेची औषधे बनवते. भारतीयांवर चाचणी करण्यात आलेले हे पहिले औषध आहे. कंपनीने 2022 च्या सुरुवातीला औषधासाठी DCGI कडून परवानगी मागितली होती. त्यानंतर कंपनीला फेज-3 क्लिनिकल ट्रायल्ससाठी सांगण्यात आले. देशभरातील 250 रुग्णांवर याची चाचणी करण्यात आली आहे.












Click it and Unblock the Notifications