Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

प्लास्टिकच्या ग्लासमध्ये दारू पिणे जास्त धोकादायक आहे की स्टीलच्या ग्लासमध्ये?, जाणून घ्या सविस्तर!

Drinking alcohol in plastic or steel glasses, Know details : दारू सेवन करणे हे आरोग्यासाठी कायमच हानीकारक आहे. समाजात दारू सेवन करणे हे वाईट लक्षण मानले जात आहे. पण, अनेक लोक सवय म्हणून दारू पितात. परंतु जर ते चुकीच्या भांड्यात टाकून पिल्या गेले तर हा धोका आणखी वाढू शकतो.

बऱ्याचदा अनेक लोक पार्टी, कार्यक्रम किंवा मोकळ्या जागेत प्लास्टिकच्या ग्लासमध्ये दारू पिणे पसंत करतात. तर काही लोक घरी स्टीलचे ग्लास वापरतात.

पण आरोग्याच्या दृष्टीने या दोन पर्यायांपैकी कोणता पर्याय सुरक्षित आहे, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?, चला तर याविषयी आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

Drinking alcohol in plastic or steel glasses

प्लास्टिकच्या ग्लासमध्ये दारू पिणे योग्य की अयोग्य?

लोक प्लास्टिकला सहज हलक्यात घेतात तर डिस्पोजेबल मानतात, परंतु ते आरोग्यासाठी सर्वाधिक धोका निर्माण करू शकते.

विशेषतः स्वस्त आणि निकृष्ट दर्जाच्या प्लास्टिकच्या ग्लासमध्ये BPA (बिस्फेनॉल ए) आणि फॅथलेट्स सारखी रसायने असतात. जी दारुच्या संपर्कात आल्यावर बाहेर पडू शकतात किंवा त्यात विरघळू शकतात.

दारुमध्ये अल्कोहोलचे प्रमाण जास्त असते आणि ते सॉल्व्हेंटसारखे काम करते, जे प्लास्टिकचे हानिकारक घटक विरघळवू शकते तसेच शरीराच्या आत पोहोचू शकते.

यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. या समस्यांमध्ये प्रामुख्याने हार्मोनल विकार, प्रजनन समस्या, कर्करोग, यकृताचे नुकसान या आजारांना देखील सामोरे जावे लागते.

इतकेच नाही तर प्लास्टिकमधून दीर्घकाळ गळणारे सूक्ष्म कण शरीरात जमा झाल्याने दीर्घकालीन आजारांचा सामना करावा लागू शकतो किंवा नवीन आजार उद्भवू शकतात.

स्टील ग्लासमध्ये दारु पिणे किती सुरक्षित?

स्टीलेन स्टील हा एक नॉन-रिअॅक्टिव्ह धातू आहे, म्हणजेच तो सहसा अल्कोहोल किंवा इतर आम्लयुक्त पेयांसह रासायनिक प्रतिक्रिया देत नाही.

याचा अर्थ असा की, स्टील ग्लासमध्ये अल्कोहोल पिल्याने त्यातून कोणतेही हानिकारक रसायन विरघळत नाही. जरी काही लोकांना स्टीलमध्ये मद्यपान केल्याने चवीत बदल जाणवू शकतो, परंतु तो केवळ चवीचा प्रश्न आहे, आरोग्याचा नाही.

जर स्टील स्वच्छ आणि गंजमुक्त असेल, तर तो दारु पिण्यासाठी एक सुरक्षित पर्याय मानला जातो. तो टिकाऊ देखील आहे आणि वारंवार वापरता येतो, ज्यामुळे पर्यावरणाचे नुकसान देखील कमी होते.

स्टील की प्लास्टिक कोणता पर्याय चांगला?

आरोग्याच्या दृष्टीने, प्लास्टिकपेक्षा स्टीलचा ग्लास खूपच सुरक्षित आहे. प्लास्टिकमध्ये दारु पिल्याने विषारी रसायने शरीरात प्रवेश करू शकतात. स्टील केवळ सुरक्षितच नाही तर पर्यावरणासाठी देखील एक चांगला पर्याय आहे.

या महत्त्वाच्या सल्ल्याचे जरूर पालन करा!

दारूचे सेवन कमी करा किंवा ते पूर्णपणे टाळा. जर तुम्हाला कधी मद्यपान करायचे असेल तर काच, स्टील किंवा सिरेमिक ग्लास वापरा.

प्लास्टिक ग्लास फक्त आपत्कालीन किंवा डिस्पोजेबल परिस्थितीतच वापरा. आरोग्यासाठी नेहमीच सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. एक छोटीशी सवय तुम्हाला मोठे नुकसान होण्यापासून वाचवू शकते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+