काय आहे 'डिंगा डिंगा' आजार, रुग्ण का करतात डान्स, लक्षणं पाहून व्हाल थक्क, कोणत्या देशात घातले थैमान
जगभरात अनेक आजार सातत्याने तोंड वर काढताना दिसत आहेत. कोरोना महामारीनंतर जागतिक आरोग्य संघटनेने सातत्याने संपूर्ण जगाला दुसऱ्या महामारीबाबत सावधान करण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोनानंतर आणखी नवा आजार महामारीचे कारण बनू शकतो, असंही सांगितलं जात आहे. त्या आजराला डिंगा डिंगा असे म्हटले जात आहे.
दरम्यान, या नव्या आजाराबाबत कोणतीही माहिती नसल्याने शास्त्रज्ञांनी या आजाराला 'X' असं नाव दिलं आहे. गेल्या काही दिवसात आफ्रिकेत या आजाराची अनेकांना लागण झाली आहे. हा आजार नेमका काय आहे आणि याची लक्षणं काय जाणून घेऊयात...!

युगांडामध्ये एका आजाराने थैमान घातलंय. युगांडामध्ये अनेकांना हा आजार झाला असून याला 'डिंगा-डिंगा' असे नाव देण्यात आले आहे. या आजाराला हे नाव त्याच्या प्रमुख लक्षणांमुळे देण्यात आल्याची चर्चा आहे. "डिंगा डिंगा" चा अर्थ हालत हालत डान्स करणे असा होतो. हा आजार झाल्यानंतर संबंधित रुग्ण हालत-डुलत राहात असल्याचे चित्र आहे.
डिंगा डिंगा हा आजाराची लागण प्रामुख्याने महिलांना
युगांडामध्ये थैमान घातलेला डिंगा डिंगा हा आजाराची लागण खासकरुन महिला आणि मुलींना झाल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र, या आजार होण्यामागे नेमकं काय कारण आहे. याबाबत डॉक्टरांना अद्याप कोणताही माहिती मिळालेली नाही. डिंगा डिंगा आजारामुळे शरिरात अनियंत्रित कंपन होतात आणि चालताना अडचणी येतात.
“Mbu”
— TRAVEL SPECIALIST🇺🇬 (@Uganda_Expozed) November 14, 2024
New sickness storms schools
It's not a dance but an undiagnosed illness called dinga dinga.
Some cases were recently reported in Bundibuyo pic.twitter.com/mjMU3wiDIM
अर्धांगवायु झाल्याप्रमाणे शरीराची अवस्था
सध्या या आजाराबाबत जास्त माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे डिंगाडिंगा या आजाराची प्रमुख लक्षण कोणती आहेत. याबाबत जास्त माहिती उपलब्ध नाही. मात्र, या आजाराची लागण झाल्यानंतर रुग्णामध्ये अनेक लक्षण आढळतात. यामध्ये रुग्णाचे शरीर सातत्याने आणि जास्त प्रमाणात हालू लागते. एखादा माणूस डान्स करतो, त्याप्रमाणे शरिराची हालचाल होऊ लागते. ताप येणे, अशक्तपणा जाणवणे किंवा अर्धांगवायु झाल्याप्रमाणे शरिराची अवस्था होणे, ही या आजारीची लक्षण असल्याचे बोलले जाते. स्थानिक माध्यमांच्या मते, या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांना चालणे जवळजवळ अशक्य होते, कारण त्यांचे शरीर अनियंत्रितपणे थरथरू लागते.
ही काही लक्षणे दिसून येत आहेत रुग्णांमध्ये
सध्या या आजाराचे नेमके कारण कळू शकलेले नाही. अशा परिस्थितीत, जेव्हा सुरुवातीला काही लक्षणे दिसतात, तेव्हा डॉक्टरांशी संपर्क साधणे आवश्यक आहे. त्यामुळे ताप येणे, अंगाचा थरकाप उडणे अशी लक्षणे दिसल्यास तातडीने तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. याशिवाय लोकांमध्ये याबाबत जागरुकता निर्माण करणेही अत्यंत गरजेचे आहे.
पण आरोग्य अधिकारी व्हायरस समजून घेण्यासाठी सक्रियपणे काम करत आहेत. बाधित व्यक्तींचे नमुने विश्लेषणासाठी युगांडाच्या आरोग्य मंत्रालयाकडे पाठवण्यात आले आहेत. पुष्टी निदान नसतानाही, रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्रतिजैविकांचा वापर केला जात आहे आणि आरोग्य तज्ञ परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करत आहेत.
डान्सिंग प्लेगची या आजाराची होतेय तुलना
'डिंगा डिंगा'ची लक्षणं हि फारच विचत्र असल्यामुळे ऐतिहासिक घटनांशी या आजाराची तुलना केली जात आहे , विशेषत: 1518 चा "डान्सिंग प्लेग". स्ट्रासबर्ग, फ्रान्समध्ये, शेकडो लोकांना अनियंत्रित नृत्याच्या हालचालींचा फटका बसला, जे अनेक दिवस चालू राहिले, ज्यामुळे खूप लोकांच्या थकव्यामुळे मृत्यू सुद्धा झाला होता.
काही प्रकरणांमध्ये या ऐतिहासिक घटना आणि 'डिंगा डिंगा' यांच्यात थेट संबंध नसतो. लक्षणांमधील समानतेने लोकांच्या कल्पनेवर कब्जा केला आहे.पण लक्षणांमध्ये साम्य दिसलं तर उपचार करणं सोपं जाईल असं तज्ज्ञांचं मत आहे.












Click it and Unblock the Notifications