Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Dengue : पावसाळा सुरू होताच आता डेंग्यूचा धोका! लक्षणे, कारणे उपाय बचाव कसा करायचा? जाणून घ्या टीप्स

Dengue Symptoms Causes Remedies : पावसाळ्याचे दिवस सुरु असून साचलेले पाणी, डबके किंवा नाल्यात असो की, कुठेही डेंग्यूच्या डासाची उत्पत्ती वाढलेली दिसत आहे. रुग्णालयातही डेंग्यू आणि डेंग्यूसदृष्य आजाराचे रुग्ण दिसून येत आहे. अशातच लहान मुलांना डेंग्यूचा धोका जास्त संभवतो, आबाल-वृद्धांपर्यंत सर्वांनीच या हंगामात काळजी घेणे गरजेचे आहे.

पावसाळ्यात दरवर्षी आरोग्य विभागाकडून डेंग्यूविरोधात मोहिम आखली जाते. तसेच वारंवार नागरिकांना डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सूचना केल्या जातात. सरकारी रुग्णालयातही डेंग्यूच्या रुग्णांसाठी विशेष सुविधा तयार केल्या जातात. पावसाळ्यात पावसाचे पाणी डासांच्या उत्पत्तीसाठी पोषक असते, विशेषतः डेंग्यू पसरवणारे एडीस डास. हेच डास डेंग्यू विषाणू पसरवतात. त्यामुळे पावसाळ्यात दक्षता घेणे खूप महत्वाचे आहे.

Dengue Symptoms Causes Remedies

पावसाळ्यात तंदुरुस्त कसे राहाल? (Dengue Symptoms Causes Remedies)

पावसाळ्यात डासांपासून होणाऱ्या आजारांचा धोका वाढतो, म्हणून पावसाळ्यात डेंग्यूपासून बचाव कसा करु शकतो आणि डेंग्यूला कारणीभूत डासांचा प्रादुर्भाव आपण कसा रोखू शकतो हे डॉक्टरांच्या मतानुसार, जाणून घेऊया.

डेंग्यूची लक्षणे काय? (Dengue Symptoms)

  • जास्त ताप
  • डोकेदुखी
  • डोळ्यांमागे वेदना
  • स्नायू आणि सांध्यामध्ये तीव्र वेदना
  • उलट्या किंवा मळमळ
  • शरीरावर लाल पुरळ
  • थकवा आणि अशक्तपणा
  • प्लेटलेट्सची संख्या कमी होणे

डेंग्यूची मुख्य कारणे (Dengue Causes)

  • एडिस एजिप्टी डास चावणे
  • स्वच्छ पाण्यात साचलेले पाणी (कूलर, भांडी, टायर, टाक्या)
  • झाकण नसलेल्या पाण्याच्या टाक्या
  • मच्छरदाणी किंवा रिपेलेंट वापरणे नाही

पावसाळ्यात डेंग्यूला तुम्ही कसे टाळू शकता (Dengue Remedies)

  • घराभोवती भांडी, कुलर, टाक्या इत्यादींमध्ये पाणी साचू देऊ नका.
  • डास चावण्यापासून वाचण्यासाठी पूर्ण बाह्यांचे कपडे घाला.
  • डास दिवसाही चावतात, म्हणून काळजी घ्या, मच्छरदाणी आणि रिपेलेंट्स वापरा
  • प्रशासन किंवा महानगरपालिकेकडून केल्या जाणाऱ्या फॉगिंगमध्ये सहकार्य करा.
  • कोणत्याही लक्षणांवर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा, आरोग्य विभागाच्या सल्ल्याचे पालन करा.

Disclaimer : या लेखात दिलेली माहिती केवळ सामान्य माहिती आणि शैक्षणिक हेतूंसाठी आहे. ती कोणत्याही प्रकारच्या वैद्यकीय सल्ल्याचा, तपासणीचा किंवा उपचारांचा पर्याय नाही. कोणत्याही आरोग्याशी संबंधित समस्या किंवा प्रश्नासाठी नेहमीच तुमच्या डॉक्टरांचा किंवा पात्र आणि अनुभवी आरोग्य प्रदात्याचा सल्ला घ्या.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+