डेंग्यू किती धोकादायक? याचा तुम्ही विचारही करु शकणार नाही, संशोधनात मोठा खुलासा
Dengue Mosquito : देशात दरवर्षी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात डासांमुळे होणा-या आजारांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ होते. डेंग्यू हा असाच एक गंभीर आजार आहे ज्यामुळे दरवर्षी मोठ्या संख्येने लोकांना रुग्णालयात दाखल करावे लागते. एडिस इजिप्ती नावाच्या डासाच्या चाव्याव्दारे होणाऱ्या डेंग्यूमुळे तीव्र तापासोबत अंतर्गत अवयवांमध्ये रक्तस्त्राव होतो. यावर वेळीच उपचार न केल्यास त्याचे घातक दुष्परिणाम होऊ शकतात.
नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, महाराष्ट्र आणि दिल्लीसह देशाच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात डेंग्यूमुळे होणाऱ्या आरोग्याच्या समस्यांबद्दल बरेच काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत, ज्याला हाडे मोडणारा ताप असेही म्हणतात.

संशोधकांच्या म्हणण्यानुसार, डेंग्यूचा संसर्ग हा हृदयाच्या आरोग्यासाठी कोविड-19 पेक्षा जास्त घातक ठरू शकतो. डेंग्यूपासून बरे झालेल्या लोकांमध्ये कोविड रुग्णांच्या तुलनेत हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी गुंतागुंत होण्याचा धोका 55% जास्त असतो.
डेंग्यूचे दुष्परिणाम कोविडपेक्षाही वाईट असू शकतात
कोविड-19 चा उद्रेक सुरू झाल्यापासून शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामांबद्दल सतत चर्चा होत आहे. संशोधनात असे आढळून आले आहे की कोविड-19 रोगाचा हृदयाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. परंतू, या अध्ययनात असे म्हटले आहे की डेंग्यूचा आजार तुमच्या हृदयाला कोविडपेक्षाही जास्त नुकसान करू शकतो.
सिंगापूरच्या शास्त्रज्ञांनी डेंग्यूमुळे होणाऱ्या या दुष्परिणामाचे अध्ययन केले आहे. संशोधकांना असे आढळून आले आहे की डेंग्यूचा संसर्ग झाल्यानंतर रुग्णांना हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजार होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत डेंग्यू झाल्यानंतर रुग्णांनी हृदयाच्या आरोग्याबाबत विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे.












Click it and Unblock the Notifications