Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

सावधान! कोरोनात आलाय दारात..मुंबई-पुण्यात रुग्ण; कोविड-19 चा व्हेरीयंट किती घातक? जाणून घ्या

Covid19 JN1 variant : जागात कोरोना व्हायरस पुन्हा डोके वर काढत असल्याचे दिसून येत आहे. 2020-21 मध्ये जग थांबवणाऱ्या कोरोनाचे अनेक शिकार बनले. या व्हायरसने जगभरातील अनेक देशात धुमाकूळ घातला, असंख्य लोकांचे बळी या व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे गेले. अशातच आता आशियातील सिंगापूर, हाँगकाँग, चीन आणि थायलंडमध्ये कोरोनाव्हायरसचे रुग्ण पुन्हा वाढत आहेत. या देशांमध्ये नवीन रुग्णांची संख्या वाढत आहे.

एवढेच नाही तर मुंबई पुण्यापर्यंत कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. कोरोनाचे 1 मे ते 19 मे दरम्यान सिंगापूरमध्ये जवळपास 3 हजार रुग्ण आढळले आहेत. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत ही संख्या 11 हजार 100 होती. येथे प्रकरणांमध्ये 28 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Covid 19 jn 1 variant

भारतात 93 प्रकरणे

रिपोर्टनुसार, जानेवारीपासून हाँगकाँगमध्ये 81 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. यापैकी तीस जणांचा मृत्यू झाला आहे. चीन आणि थायलंडमध्येही अलर्ट जारी करण्यात आला आहे. आतापर्यंत भारतात कोविड-19 संबंधित 93 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. यावेळी, ओमिक्रॉनचा नवीन प्रकार JN1 आणि त्याचे उप-प्रकार LF7 आणि NB1.8 दिसून येत आहे.

Take a Poll

काय म्हणतात आरोग्य अधिकारी?

बोल्ड स्कायने अधिकाऱ्यांच्या हवाल्यानुसार, वृत्त दिले आहे. अधिकारी सांगतात की, सध्या सक्रीय असलेला कोविड -19 चा नवीन व्हेरीयंट पूर्वीपेक्षा जास्त धोकादायक आहेत किंवा व्हायरस वेगाने पसरत आहे याचा कोणताही पुरावा समोर आलेला नाही. कोरोनाचा परिणाम कमकुवत रोगप्रतिकार शक्ती असलेल्या लोकांवर होतो हा याआधीचा अनुभव पाहता आताही तसाच परिणाम कमी रोगप्रतिकार शक्ती असलेल्या लोकांवर होऊ शकतो असेही अधिकारी सांगतात.

JN.1 प्रकार काय आहे?

  • JN.1 प्रकार हा कोरोनाव्हायरसच्या ओमिक्रॉन फॅमिलीतील एक नवीन उपप्रकार आहे.
  • या उपप्रकाराला पूर्वी BA.2.86.1 म्हटले जात होते. त्यात सुमारे 30 अनुवांशिक उत्परिवर्तन झाले आहेत, जे शरीराची प्रतिकारशक्ती कमकुवत करू शकतात.
  • JN.1 मध्ये वेगाने पसरण्याची क्षमता आहे, खासकरुन ज्यांना पूर्वी संसर्ग झाला किंवा ज्यांना लसीकरण करण्यात आले आहे अशा लोकांमध्ये हा संसर्ग वेगाने होऊ शकतो.

किती घातक आहे JN.1?

जेएन-1 ची सध्या लक्षणे गंभीर मानली जात नाहीत. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या मते, हा प्रकार जगभरात सर्वात सामान्य बनला आहे. त्याची लक्षणे काही दिवसांपासून ते आठवडे टिकू शकतात आणि जर ती दीर्घकाळ टिकली तर ती दीर्घकालीन कोविडला कारणीभूत ठरू शकतात.

JN.1 प्रकाराची लक्षणे

  • बहुतेक कोरोनाच्या मागील प्रकारांमध्ये दिसणारी लक्षणे सारखीच आहेत. यामध्ये घसा खवखवणे, खोकला, ताप अंगदुखी.
  • थकवा काही लोकांना सर्दी आणि डोकेदुखीची समस्या होऊ शकते. बहुतेक लोकांमध्ये, ही लक्षणे सौम्य असल्याचे दिसून येते आणि लोक घरीच बरे होत आहेत. परंतु वृद्ध, गर्भवती महिला आणि कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.

भारत आणि आशियातील परिस्थिती काय आहे?

अलिकडेच भारतातील काही राज्यांमधून कोरोनाचे नवीन रुग्ण आढळले आहेत. काही प्रकरणे विशेषतः महाराष्ट्र, केरळ आणि दिल्लीमध्ये आढळली आहेत. त्याच वेळी, आरोग्य विभागाने चीन आणि सिंगापूर सारख्या देशांमध्ये अलर्ट जारी केला आहे. सरकारकडून सध्या याबद्दल सरकार लवकरच गाईडलाईन लागू करु शकते.

मास्क घाला संसर्ग टाळा

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने काही खबरदारी घेण्याचे आणि उपाय सांगितले आहेत. त्यानुसार,
कोरोनाला अटकाव करण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी लोकांनी मास्क घालायला हवा. आजारी वाटत असल्यास घरी राहण्याचा आणि वेळोवेळी हात धुण्याचा सल्ला दिला जातो. हातांच्या स्वच्छतेची काळजी घ्यावी. निरोगी अन्न खावे आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवायला हवी, गरज पडल्यास बूस्टर डोस घ्यावा.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+