Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

कोरोनाचा नवा प्रकार 'निंबस' चिंता वाढवणारा! शरीरात कुठे करतो अपाय, किती होतो त्रास, जाणून घ्या सर्व

Covid Variant Nimbus : कोरोनाचा संसर्ग देशात स्थीर असून मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत काहीशी घट दिसून येत आहे. हा दिलासा असून मागील २४ तासांत ३३६ नवीन प्रकरणं समोर आली आहे. यामध्ये तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाचा संसर्ग जरी नियंत्रणात असला तरीही एक चिंतेचे कारण आता सतावत आहे. ते म्हणजे अमेरिकेत, कोरोनाचा नवीन प्रकार NB.1.8.1, हा वेगाने पसरत आहे. याचे नाव 'निंबस' असे असून तो शरीराच्या विशिष्ट भागावर मोठा परिणाम करत असल्याचे समोर आले आहे.

Covid Variant Nimbus

संसर्ग झाल्यानंतर शरीरात कुठे होतो त्रास?

बोल्ड स्कायनुसार, कोरोनाचा नवीन प्रकार असलेला निंबस हा खासकरुन घशावर परिणाम करत आहे. तज्ज्ञ त्याला 'रेझर ब्लेड थ्रोट' असेही म्हटले जात आहे याचे प्रमुख कारण म्हणजे जेव्हा या कोरोनाच्या प्रकाराचा संसर्ग होतो तेव्हा घशात ब्लेड घातल्याचा आणि खूप खवखव होत असल्याचा त्रास जाणवते.

रोगप्रतिकार शक्ती अन् संसर्गाचा परिणाम

मीडिया रिपोर्टनुसार, आजारपण अथवा ज्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत आहे त्यांच्यासाठी हा संसर्ग खूप वेदनादायक असू शकतो असेही सांगितले जात आहे.

निंबस हा नवीन प्रकार किती धोकादायक?

यूएस सीडीसी (सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन) नुसार, जून २०२५ च्या पहिल्या दोन आठवड्यात नोंदवलेल्या कोरोनाच्या सर्व नवीन प्रकरणांपैकी सुमारे ३७ टक्के प्रकरणे या निंबस व्हेरिएंटची आहेत. हा प्रकार पूर्वीपेक्षा वेगाने पसरत आहे आणि घशाला खूप त्रास होत आहे.

निंबस प्रकाराची लक्षणे काय आहेत?

  • घशात तीव्र जळजळ आणि वेदना, जी रेझर ब्लेडसारखी वाटते
  • अन्न गिळण्यास किंवा पाणी पिण्यास त्रास होणे
  • बोलण्यास त्रास होणे किंवा वेदना होणे
  • श्वास घेण्यास त्रास होणे
  • जास्त ताप आणि थंडी वाजून येणे
  • छातीत घट्टपणा आणि जडपणा

परिस्थिती कधी गंभीर होऊ शकते?

आरोग्य तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, बहुतेक प्रकरणांमध्ये निंबस प्रकाराची लक्षणे सौम्य असतात, परंतु जर घशात दुखणे कायम राहिले, श्वास घेण्यास त्रास होत असेल, जास्त ताप येत असेल किंवा छातीत दाब जाणवत असेल तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. विशेषतः वृद्ध, गर्भवती महिला किंवा ज्यांना आधीच कोणत्याही आजाराने ग्रासले आहे त्यांनी अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

निंबस प्रकार टाळण्यासाठी उपाय काय कराल?

  • गर्दीच्या किंवा बंद ठिकाणी मास्क घालायला विसरू नका.
  • किमान २० सेकंद साबणाने वारंवार हात धुवा.
  • लक्षणे दिसताच ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या, उशीर करू नका.
  • कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या लोकांनी विशेष खबरदारी घ्यावी लागेल.

घशासाठी खुप वेदनादायी

वृद्ध, गर्भवती महिला आणि गंभीर आजारांनी ग्रस्तांनी लक्षात ठेवायला हवे की, कोरोनाचा नवीन प्रकार, निंबस, घातक असू शकत नाही, परंतु घशावर त्याचा परिणाम खूप वेदनादायक आहे.

Disclaimer : या लेखात दिलेली माहिती केवळ सामान्य माहिती आणि लोकजागृतीसाठी आहे. ती कोणत्याही प्रकारच्या वैद्यकीय सल्ल्याचा, तपासणीचा किंवा उपचारांचा पर्याय नाही. कोणत्याही आरोग्याशी संबंधित समस्या किंवा प्रश्नांसाठी नेहमीच तुमच्या डॉक्टरांचा किंवा पात्र आणि अनुभवी आरोग्य प्रदात्याचा सल्ला घ्या.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+